Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यातील 'या भागात पाऊस पडणार; जूनच्या पहिल्या दिवशी कोणत्या जिल्ह्यात कसे राहील हवामान? घ्या जाणून

Maharashtra weather : मान्सून येत्या पाच जूनपर्यंत फारसा सक्रीय राहणार नसून सध्या मान्सून मराठवाड्याच्या दिशेने खूपच हळूहळू सरकत आहे, तूर्त पाच जूननंतरच मान्सून मराठवाडा आणि महाराष्ट्रात खरे रुप दाखवायला सुरुवात करणार आहे, तर दुसरीकडे आज 1 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने आज आणि येत्या सहा जूनपर्यंत भाकित व्यक्त केले आहे, त्यानुसार, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात पाऊस पडणार हे जाणून घेऊया.

Maharashtra weather

कोकण

कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग आदी पट्ट्यात काही ठिकाणी आज पाऊस पडू शकतो. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. ही स्थिती तीन जूनपर्यंत राहील, त्यानंतर तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता सहा जूनपर्यंत राहील.

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आदी जिल्ह्यात आज उद्यासह येत्या सहा जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात आज उद्यासह येत्या सहा जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Maharashtra weather

विदर्भ

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि इतर जिल्ह्यात आज आणि उद्या आणि चार जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर पाच आणि सहा जूनला तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

पुण्यात हवामानाची स्थिती काय?

पुणे आणि आसपासच्या प्रदेशात आकाश मुख्यतः निरभ्र राहीलपण दुपारी आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आगामी सहा जूनपर्यंत पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही.

राजस्थानमधील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (आज का मौसम) राजस्थानमधील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. अलवर, कोटा, उदयपूर, भरतपूर, बुंदी आणि बारमेर येथे मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. ईशान्येकडे पाहिल्यास, आसाम, मणिपूर, सिक्कीममध्ये पावसासाठी 'यलो अलर्ट' अजूनही लागू आहे, तर हिमाचल, काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडेल. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूमध्ये आजही ऑरेंज अलर्ट लागू आहे.

ठळक घडामोडी

  • नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सौमा आज दि. ३१ मे रोजी कायम आहे.
  • गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानः कोंकण गोवा व मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी जोरदार पडला. महाराष्ट्र व गोवा राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
  • कॉंकण गोव्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसनुसार)

मुंबई (कुलाबा) ३३.२, सांताक्रूझ ३३.७, अलिबाग ३३.७. रत्नागिरी ३२.०. पणजी (गोवा) ३२.०. डहाणू ३४.९, पुणे ३२.५. लोहगाव ३४.६, अहिल्यानगर ३३.०, जळगाव ३८.२, कोल्हापूर ३१.०, महाबळेश्वर २३.८. मालेगाव ३६.६, नाशिक ३२.१. सांगली ३२.४. सातारा ३२.२. सोलापूर ३४.२. धाराशिव ३१.१. छत्रपती संभाजीनगर ३४.०, परभणी ३४.४. नांदेड बीड ३४.५. अकोला ३६.०, अमरावती बुलढाणा ३२.८. ब्रह्मपुरी ३८.०. चंद्रपूर ३५.०, गोंदिया ३६.६. नागपूर ३७.०, वाशिम ३४.४. वर्धा ३४.५, यवतमाळ ३३.४.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+