नाशिक, पुण्यात दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता! जिल्हानिहाय आजची पावसाची स्थिती जाणून घ्या
Maharashtra Weather Heavy rain likely in Pune Nashik for 2 days : राज्यात पावसाची स्थिती कायम असून येत्या दोन दिवसांत कोकणसह नाशिक, पुणे घाटात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात आज काही ठिकाणी आणि पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज दिनांक 25 जून रोजी पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही पावसाची शक्यता आहे.

राज्यातील हवामानाचा अंदाज
रायगड, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट
रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
24 Jun, 11.30 pm, satellite obs indicate, possbility of light to mod rains over parts of South Vidarbha and adjoining areas of Marathavada & Telangana too. pic.twitter.com/gCpZsvsakh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2025
नाशिक, पुणे घाटात रेड अलर्ट
आज मध्य महाराष्ट्रात नाशिक व पुणेच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या घाट विभागांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर पुढील दोन दिवस एक - दोन ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
कोल्हापूर, साताऱ्यात ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर व सातारा घाट विभागात पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
मराठवाड्यात बीड वगळता सर्व जिल्ह्यात पाऊस
मराठवाड्यातील बीड वगळता छत्रपती संभाजीनगर, लातूर, परभणी, धाराशीव, हिंगोली, जालना या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भात ऑरेंज अलर्ट - मेघगर्जनेसह पाऊस होणार
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट तसेच सोसायट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आज काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
नाशिक, जळगावमध्ये येत्या दोन दिवसांसाठी येलो अलर्ट
जळगाव नाशिक या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुण्यात पावसाची स्थिती कशी राहील
हवामानाचा अंदाजाबाबत सांगायचे झाल्यास 24 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ होते आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा काही भागात पाऊस पडला. आज 25 जून रोजी आकाश सामान्यतः ढगाळ आहे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची आज शक्यता आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस पुणे व आसपासच्या परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications