Maharashtra weather : 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कोणत्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस? वाचा
Maharashtra weather : मान्सुनचे यंदा लवकरच आगमन होत असून आजपासून हवामानात मोठे बदल होत आहेत. राज्यात आधीच पावसाळी वातावरण असतानाच आता पावसाचा जोर वाढणार आहे. येत्या चोवीस तासांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान, कोकण किनारपट्टी, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने उद्या २५ मे पर्यंत रेड अलर्ट दिला आहे. तर २७ मे पर्यंत पावसाची दाट शक्यता आहे. राज्यातील कमाल तापमानही घसरले असून तापमानात आणखी घट अपेक्षित आहे.

कुठे कसा राहील पाऊस आणि वातावरण
कोकण
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसंच मुंबई ठाणे आणि पालघर येथे मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. येथे सोसाट्याचा वापार आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. यादरम्यान समुद्रात उंच लाटा येतील त्यामुळे समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यादरम्यान काही ठिकाणी गारांचा पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. या काळात जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण राहील.
विदर्भ
विदर्भातील भंडारा, गोंदीया, नागपूर चंद्रपूर येथे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो विदर्भात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.
मुंबई शहर उपनगरात कसे राहील हवामान
आज मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहील. तसेच पालघर, ठाणे आणि मुंबईत ऑकेंड अलर्ट जारी करण्यात आला असून पाऊस चांगली बॅटींग करु शकतो.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- कोकणात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला.
- कोकण व विदर्भात बर्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला.
- कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३२.६, सांताक्रूझ ३३.४. अलिबाग ३१.६, रत्नागिरी २७.५, पणजी (गोवा) २९.८. डहाणू ३५.१, पुणे २९.६, लोहगाव ३१.०. अहिल्यानगर ३१.१. जळगाव ३४.४. कोल्हापूर २५.२, महाबळेश्वर २०.०, मालेगाव ३५.४. नाशिक २९.२. सांगली २६.६, सातारा २५.६. सोलापूर ३२.७, धाराशिव छत्रपती संभाजीनगर ३१.२, परभणी ३२.२, नांदेड, बीड ३१.८, अकोला ३२.३. अमरावती ३१.८, बुलढाणा ३०.२. ब्रह्मपुरी ३२.०, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३२.०, नागपूर ३१.५. वाशिम ३१.४. वर्धा ३०.०, यवतमाळ २८.६.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे ३५.४ अंश सेल्सियस नोंदवले गेले.












Click it and Unblock the Notifications