Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता, राज्यात आज कुठे, कुठे मुसळधार पाऊस होणार घ्या जाणून

Maharashtra Weather Heavy rain likely in Mumbai Pune : राज्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडत असून कोकणासह मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे तर पुण्यासह आज महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रात काल १५ जूनपासून मान्सूनचा पाऊस सक्रीय झाला आहे. रविवारपासून महराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. अशातच कोकण आणि मुंबईत पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबईत मात्र पाऊस काहीसा वाढणार आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट आहे. तिथे जोरदार पाऊस कोसळत आहे.

Maharashtra Weather Heavy rain likely in Mumbai Pune

कुठे कसा पडणार पाऊस

  • रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
  • रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,सातारा आणि कोल्हापूर येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
  • मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली येथे पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
  • बुलडाणा, अकोला-अमरावती, वाशिम-यवतमाळ, वर्धा येथेही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल राज्यात कुठे - कुठे पाऊस पडला..

राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. रायगड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात पाऊस झाला, तर कोकणातही जोरदार पाऊस झाला.

पालघर जिल्ह्यातल्या काही भागात जोरदार पावसाची हजेरी

पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, चारोटी, कासा परिसरात आज संध्याकाळच्या वेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातल्या बोईसर, पालघर आणि इतर भागात सकाळ पासून पावसाचं वातावरण कायम होतं. आणि अधून मधून पावसाच्या सरी बरसत होत्या.

गेल्या २४ तासांतील पाऊस

  • कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस
  • मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणीः मध्य महाराष्ट्रात व विदर्भात काही ठिकाणी: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
  • विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
  • कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांतील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसनुसार)

मुंबई (कुलाबा) ३२.०, सांताक्रूझ ३३.५. अलिबाग रत्नागिरी २७.०, पणजी (गोवा) २९.२, डहाणू ३४.०, पुणे ३२.४. लोहगाव ३३.९, अहिल्यानगर ३१.२, जळगाव ३८.५, कोल्हापूर २८.६, महाबळेश्वर २३.६. मालेगाव ३५.६. नाशिक ३३.४. सांगली २९.७. सातारा २९.३. सोलापूर ३३.३. धाराशिव ३१.४. छत्रपती संभाजीनगर ३३.३. परभणी ३५.६, नांदेड ३५.०, बीड अकोला ३९.१. अमरावती ४०.०, बुलढाणा ३५.०. ब्रह्मपुरी ३९.८. चंद्रपूर ३६.२. गोंदिया ३८.९, नागपूर ३९.४. वाशिम वर्धा ४०.४. यवतमाळ ३८.०.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+