राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पाऊस, नाशिकला पावसाने झोडपले, वीज पडून शेतकरी ठार! कुठे बरसात होणार वाचा
Maharashtra Weather Heavy rain likely for next 3 days : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वादळी वातावरण असून पावसाच्या सरी कोसळत आहेत. 19 मे रोजी सर्वदूर पाऊस पडल्यानंतर आता आणखी तीन दिवस पावसाचे आहेत. या काळात सोसाट्याचा वारा आणि विजासह पाऊस कोसळणार आहे.
महाराष्ट्रात आधीच 25 मेपर्यंत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, अशातच हलक्या सरी पडत आहेत. काल महाराष्ट्रातील नाशिक छत्रपती संभाजीनगर, जालनासह बहुतांश ठिकाणी विजांसह पाऊस झाला. जाणून घेऊया कुठे-कुठे बरसात होणार.

मुंबई आणि कोकण विभाग
मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण असून हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच कोकणमाथ्यावर पाऊस पडू शकतो. जोरदार सरीमुळे दरड कोसळण्याच्या घटनाही घडू शकतात.
मध्य महाराष्ट्र विभाग
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा,कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यादरम्यान वादळी वारे वाहू शकतात ज्यांचा वेग ताशी 50 किमी असू शकतो.
मराठवाडा विभाग
मरावाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे आज पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसह उर्वरीत मराठवाड्यात येत्या काही दिवस येथे पाऊस होऊ शकतो.
विदर्भ विभाग
विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. या काळात वादळी वारे वाहण्याची शक्यता असून येथील कामाल तापमानात कमालीची घट झाली आहे.
उत्तर महाराष्ट्र विभाग
उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात मेघगर्जना होऊ शकते.
नाशिक जिल्ह्यात पावसाने झोडपले; वीज पडून एकाचा मृत्यू
शहर जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. वीज कोसळल्याने निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे येथे दीपक रंगनाथ रहाणे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर नाशिक तालुक्यातील जातेगाव येथे आदित्य राजाराम वळवे हा 12 वर्षीय मुलगा जखमी झाला.
चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे विजांच्या कडकडाटाने एका पोल्ट्रीफार्ममधील सुमारे दोन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला तर येवला, सिन्नर, चांदवड, मनमाड आदी तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले. या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्तशृंगी देवी गड घाट रस्त्यावरील दगड एका वाहनावर पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. नाशिक शहरात बहुतांश भागात सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली












Click it and Unblock the Notifications