राज्यासाठी पुढचे 48 महत्वाचे! आज 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार! सोसाट्याचा वारा, विजांसह बरसात

Maharashtra Weather Forecast today : राज्यात गणपती उत्सवाला जशी रंगत येत आहे, तसेच पावसालाही उधाण येत आहे. राज्या २८ ऑगस्टला सर्वदूर पाऊस पडल्यानंतर आज २९ ऑगस्ट रोजीही बहुतांश भाग पावसाने व्यापला जाणार आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सात दिवस तर विदर्भामध्ये पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

maharashtra weather

'या' जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार!

पुणे सातारा कोल्हापूर जिल्हा व कोल्हापूरच्या घाट विभागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली, त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Take a Poll

विदर्भात दोन दिवस पाऊस, येलो अलर्ट घोषित

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील दोन-तीन दिवस तुरळ ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी येलो अलर्ट पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

राज्यातील उर्वरित भागात कसा असेल पाऊस?

राज्याच्या उर्वरित भागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे उर्वरित भागासाठी दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या विभागासाठी 30 तारखेपासून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात असा राहील पाऊस

पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात चार ते पाच दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभाग विभागात पुढील दोन दिवस तुलना ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे घाट विभागासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उद्या ३० ऑगस्ट रोजी कसे असेल महाराष्ट्रातील हवामान?

कोकणातील स्थिती : बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील स्थिती: मराठवाड्यात काही आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.

मध्य महाराष्ट्रातील स्थिती : मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो.

विदर्भातील स्थिती : विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे असे पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+