Maharashtra Weather:कोकण मराठवाड्यात पाऊस होणार, आज उद्या वादळी वाऱ्यांशी सामना, कुठे पडणार सरी वाचा
Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या कडाक्याऐवजी पावसाच्या सरीच जास्त बरसत आहेत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभुमीवर आजही महाराष्ट्रातील काही विभागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. ११ मे रोजी पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आजही मराठवाडा आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पालघर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नंदुरबार, धुळेसह मराठवाड्यातील जालना, नांदेड, लातूर आणि धाराशीव येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दरम्यान महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तापमानात अशंतः घट दिसून येत आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत, त्यामुळे या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.

कसे राहील महाराष्ट्रातील आज आणि उद्याचे हवामान
कोकण विभाग
कोकणात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उद्या १३ मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तसेच उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- विदर्भात काही ठिकाणीः कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
- मध्य महाराष्ट्रात व विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट
- मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
गेल्या चोवीस तासांत राज्यात अमरावती येथे सर्वात जास्त ४१.४ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले.
मुंबई (कुलाबा) ३३.०, सांताक्रूझ ३३.५. अलिबाग रत्नागिरी ३४.४, पणजी (गोवा) ३५.२, डहाणू ३४.३. पुणे ३५.४, लोहगाव ३९.२, अहिल्यानगर जळगाव ३९.५, कोल्हापूर ३४.८, महाबळेश्वर २८.५, मालेगाव ३७.८, नाशिक ३३.५. सांगली ३५.५, सातारा ३६.२. सोलापूर ३८.९, धाराशिव ३८.१. छत्रपती संभाजीनगर ३७.४, परभणी ३९.४. नांदेड, बीड ३६.५, अकोला ४०.६, अमरावली ४१.४, बुलढाणा ३६.६, ब्रह्मपुरी ४१.१, चंद्रपूर ३८.६. गोंदिया ३८.७, नागपूर ३९.६, वाशिम ३८.२. वर्धा ३९.५. यवतमाळ ४०.०.












Click it and Unblock the Notifications