Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

..हा हिवाळा की, पावसाळा! फेंगलचा महाराष्ट्रात परिणाम, मराठवाड्यासह 7 जिल्ह्यात पावसाची शक्यता

Maharashtra Weather : ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता असल्याने आणि ढगाळ हवामानामुळे हा पावसाळा तर नाही ना..अशी मिश्किल टिप्पणी केली जात आहे. अशातच दक्षिण भारतात फेंगलने जो कहर केला तेच चक्रीवादळ आता अरबी समुद्रावर घोंगावत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यातील सहा ते सात जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

आज उद्या आणि परवा तीन दिवस पावसाची शक्यता असून दोन दिवस तापमानातही स्थिरता राहणार आहे. यानंतर मात्र किमान तापमानात घट होऊ शकते असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Maharashtra Weather

ठळक मुद्दे

  • कमी दाबाचा पट्टा कर्नाटक समु्द्र सपाटी व पुर्वमध्य अरबीसमुद्रालगत स्थीर आहे. महाराष्ट्रातील चारही विभागाचा अंदाज पाहता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील सहा दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान
  • विदर्भात आज आणि उद्या हवामान कोरडे राहील तसेच पाच ते सात डिसेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

  • कोकण गोव्यात रत्नागिरीत पाच तारखेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान तीस ते चाळीस किमी ताशी वेगाने वारे वाहतील.
  • मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात उद्या तर कोल्हापूर, सातारा येथे पाच व सहा डिसेंबरला सोलापूर येथे पाच डिसेंबरला पाऊस होईल. मराठवाड्यातील लातूर आणि धाराशीव येथे पाच डिसेंबरला मेघ गर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल आणि तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
  • राज्यात पुढील दोन दिवसांत किमान तापमानात फारसा बदल होणार नाही पण नंतर तापमानात दोन ते चार डिग्री सेंटीग्रेडने तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
  • उत्तर भारतात थंडीचा प्रभाव

    उत्तर भारतात थंडीचा प्रभाव दिसू लागला आहे. दाट धुक्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. दरम्यान, 15 डिसेंबरनंतर तापमानात आणखी घट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दिल्लीच्या हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, येथे अजूनही हवामान कोरडे आहे. या आठवड्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. स्कायवेदरच्या मते, डिसेंबरच्या अखेरीस पावसाची शक्यता आहे. कमकुवत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 7-8 डिसेंबर रोजी दिसून येईल, त्यामुळे ढग असू शकतात, परंतु पाऊस अपेक्षित नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+