Maharashtra Weather : राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस, चक्रीवादळामुळे अवकाळी, आज-उद्या कोठे पाऊस वाचा?
Maharashtra Weather : महाराष्ट्रात फेंगल चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असून बहुतांश ठिकाणी काल रात्री ते आज पहाटे पाऊस पडला. वातावरण ढगाळ आणि चक्रीवादळाने उत्तरेकडील गार वारे अडवल्याने राज्यातून थंडी गायब झाली आहे. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे ऑक्टोबर हिट डिसेंबरमध्येही आता जाणवू लागली आहे.
डिसेंबरमध्ये उष्णता वाढली असून मुंबईत तर 37 डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. देशभरातील तापमानात कमालीचा फरक असून उत्तर भारतात थंडी तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस आणि उष्णता आता जाणवत आहे. तर दक्षिण भारतात फेंगलमुळे पावसाची स्थिती आहे. महाराष्ट्रात मागच्या 24 तासात 3 ते 6 डिग्रीने तापमान वाढले आहे हे विशेष.

काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 5 आणि 6 डिसेंबर रोजी राज्यामध्ये विविध ठिकाणी हलक्यातील मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगाळ वातावरण कायम राहणार आह. येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धारशिव या जिल्ह्यात आत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज
- फेंगल चक्रीवादळाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात नाही पण थंडवारे अडले ते काही दिवसांनी पुर्ववत होतील आणि राज्यात गारवा जाणवेल.येत्या काही दिवसांत देशभरात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता
- येत्या तीन दिवसांत वायव्य भारतातील किमान तापमानात 2 अंशांनी घट होईल, तर पूर्व भारतात येत्या दोन दिवसांत तापमान 2 अंश सेल्सिअसने घसरेल आणि त्यानंतर ते पुन्हा 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढेल.
- येत्या पाच दिवस मध्य भारतात तापमान स्थीर राहील.
- येत्या चोवीस तासांत आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.
- तामिळनाडू, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता.












Click it and Unblock the Notifications