महाराष्ट्र गारेगार, दिल्ली-एनसीआरमध्ये धुक्याचा कहर! वाचा कुठे पावसाचा इशारा?
Maharashtra Weather : महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात पारा खाली आला असून थंडीची लाट आहे. त्यामुळे पुन्हा स्वेटर मफलर बाहेर आल्या असून थंडीसह दिल्लीत धुक्यांचे दुहेरी आक्रमण जानेवारी महिन्यात लोकांना सतत त्रास देत आहे. दरम्यान, चीनमधून भारतात दाखल झालेल्या ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) विषाणूने अडचणीत आणखी वाढ केली आहे. दुसरीकडे, शुक्रवारी (10 जानेवारी, 2025) काही ठिकाणी दृश्यमानता शून्य राहिली, ज्यामुळे हवाई आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
विशेषतः दिल्ली आणि आसपासच्या भागात सकाळी दाट धुके होते, त्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य झाली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGI) ने उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सल्लागार जारी केला. धुके आणि शांत वाऱ्यांमुळे एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) अत्यंत खराब स्थितीत पोहोचला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण किनारपट्टी क्षेत्रासह उत्तर महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे चक्राकार वारे वाहत असल्यानं ही स्थिती उदभवल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली असून, इथं पारा 5 अंशांवरपोहोचला आहे, तर सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये करण्यात आली असून, इथं तापमान 33 अंशांच्या घरात राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दैनिक मौसम परिचर्चा (09.01.2025)
— India Meteorological Department (@Indiametdept) January 9, 2025
YouTube : https://t.co/9NS77RMw1N
Facebook : https://t.co/OZqUX9yXDQ#imd #weatherupdate #india #rain #weatherupdate #weatherforecast #weathernews #coldwave #coldday #rainfallupdate #fog #mausam@moesgoi @ndmaindia @DDNational… pic.twitter.com/Sw9ZgHSPnN
दिल्लीसह इतर राज्यांची हवामान स्थिती जाणून घेऊया?
दिल्लीतील खराब हवेच्या गुणवत्तेचा आणि धुक्याचा परिणाम AQI 409: शुक्रवारी सकाळी समीर ॲपनुसार, दिल्लीचा AQI 409 रेकॉर्ड करण्यात आला आहे. केले, जे 'गंभीर' श्रेणीत आहे.
GRAP फेज 3 लागू: प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यावश्यक नसलेल्या बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. शून्य दृश्यमानता: दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्ये अनेक ठिकाणी दृश्यमानता शून्य राहिली.
उड्डाणे आणि गाड्यांवर होणारा परिणाम: प्रभावित झालेल्या उड्डाणे आणि गाड्यांच्या संख्येबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट तपशील नाहीत. हवेची गुणवत्ता कशी मोजली जाते?
AQI इनडेक्स
AQI सहा श्रेणींमध्ये विभागलेला आहे. चांगली (0-50) समाधानकारक (51-100) मध्यम (101-200) खराब (201-300) अतिशय खराब (301-400) गंभीर (401-500)












Click it and Unblock the Notifications