Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आज-उद्या राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता! विदर्भात गारपीटीचा अंदाज, कसे राहील हवामान? जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र काल पाऊस पडला असून आज 2 आणि 3 एप्रिललला तुरळक तर काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर 4 एप्रिलला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात एकीकडे तापमान वाढ होत असतानाच ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत आहे, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने हजेरी लावली त्यानंतर आज आणि उद्याही वरुणराजा हजेरी लावणार आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या ढगाळ वातावरण आहे.

Maharashtra Weather

कोठे कधी पडणार पाऊस?

  • 2 आणि 3 एप्रिललला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल.
  • काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • 3 एप्रिलला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची तर गारा पडण्याचीही शक्यता आहे. तसेच 4 एप्रिलला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
  • 4 एप्रिलला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन्ही ठिकाणी या दिवशी मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    Take a Poll

    ठळक घडामोडी - यामुळे ढगाळ वातावरण आणि पडतोय पाऊस

    • आज वाऱ्याची चक्रीय स्थिती मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर आहे.
    • कमी दाबाचा पट्टा आता दक्षिण छत्तीसगड ते मध्य महाराष्ट्र व लगतच्या चक्रीय स्थिती पर्यंत (विदर्भ व मराठवाडा मार्गे) जात आहे.
    • उत्तर-दक्षिण कमी दाबाचा पट्टा आता मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय स्थिती ते कोमोरिन क्षेत्रापर्यंत (कर्नाटक ते तामिळनाडू मार्गे) जात आहे.

    गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान कोठे पाऊस पडला?

    गेल्या २४ तासांत कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

    अकोल्यात रिमझिम पाऊस सुरू

    प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार 1 एप्रिल 2025 ते 3 एप्रिल 2025 दरम्यान पूर्व विदर्भ तसेच वऱ्हाडातील जिल्हयांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्याप्रमाणे अकोल्यात काही पहाटेपासून ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. हवा किंवा ढगांचा कडकडाट नाही.

    जालना शहरासह जिल्ह्यात सर्वत्र ढग रात्रीपासून पावसाची संततधार सुरु

    जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, सूर्यदर्शन झालेलं नाही. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी, मुरमा, खालापूरी, मासेगाव, घनसावंगी शहर, तीर्थपुरी, खापरदेव हिवरा, शिंदे वडगाव, एकलहेरा, पिठोरी सिरसगाव, आंतरवाली टेंभी, बाचेगाव, देवडी हादगाव, पाडोळी बुद्रुक या गावांमध्येही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मका, गहू आणि हरभरा यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

    Maharashtra Weather

    पालघर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण

    पालघर जिल्ह्यातल्या वातावरणात बदल दिसून येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभर पावसाच वातावरण कायम राहील. पावसाचे हलके थेंब ही पडले. ऐन उन्हाळ्यात आज सूर्यदर्शन देखील झालं नाही. काल देखील सकाळी काही काळ ढगाळ वातावरण राहील.

    गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

    मुंबई (कुलाबा) ३२.७, सांताक्रूझ ३३.२, रत्नागिरी ३२.५, पणजी (गोवा) ३३.६, डहाणू ३३.१, पुणे ३९.२, लोहगाव ४०.६, अहिल्यानगर ३६.०, जळगाव ३९.६, कोल्हापूर ३७.४. महाबळेश्वर ३१.४, मालेगाव ३८.२, नाशिक ३८.६, सांगली ३७.०, सातारा ३७.७, सोलापूर ४०.८, धाराशिव छत्रपती संभाजीनगर ३९.४, परभणी ४०.५, नांदेड, बीड ४१.०, अकोला ४९.४, अमरावती ४०.८, बुलढाणा ३८.० ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४२.०, गोंदिया ३९.२, नागपूर ३९.९, वाशिम ४०.२, वर्धा ४०.५, यवतमाळ ४०.२.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+