मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, विदर्भ, मराठवाड्यात तापमान किती वाढले! जिल्हानिहाय घ्या जाणून
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील तापमानात वाढ होत असतानाच आता आगामी चोवीस तास हवामानाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. कारण हळूहळू तापमान वाढत असतानाच आता मध्य महाराष्ट्रात पावसाची तर विदर्भात उष्णतेच्या झळ बसत आहेत. राज्यात मध्य महाराष्ट्र वगळता आज आणि येत्या चार पाच दिवसांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भ, मराठवाड्यातील तापमानात किंचित वाढ आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रम्हपुरी येथे ३९.३ तर सर्वात कमी अहिल्यानर येथे १५.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. मध्य महाराष्ट्रात आज तुरळ ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान अन् तापमान
- गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.
- मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
- राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
- संपूर्ण राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल किमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३२.४/२४.४, सांताक्रूझ ३३.५/२३.२, अलिबाग, रत्नागिरी ३३.०/२१.६, पणजी (गोवा) ३४.४/२३.०, डहाणू ३३.९/२०.६, पुणे ३६.६/१७.२, लोहगाव ३७.८/२०.८, अहिल्यानगर १५.७. जळगाव ३७.७/१७.०, कोल्हापूर ३७.१/२१.०, महाबळेश्वर ३१.८/१९.५, मालेगाव ३८.२/१८.२, नाशिक ३५.३/१६.४, सांगली ३७.४/२१.२, सातारा ३६.७/१८.४, सोलापूर ३९.१/२४.४, धाराशिव ३७.२/२०.४. छत्रपती संभाजीनगर ३६.८/१८.८, परभणी ३७.८/२१.०, बीड २०.०, अकोला ३९.१/ २०.१, अमरावती ३८.४/१९.७, बुलढाणा ३६.२/२२.०, ब्रह्मपुरी ३९.३/ २४.३. चंद्रपूर ३८.०/-, गोंदिया ३५.४/२२.५, नागपूर ३७.६/२१.४, वाशिम ३७.८/-, वर्धा ३८.४/२०.६, यवतमाळ ३८.० / १९.४.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ३९.३ अं. से. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे १५.७ अं. से. नोंदवले गेले. आज आणि येत्या पाच सहा दिवसांतील महाराष्ट्रातील हवामान जाणून घेऊया.
विदर्भातील हवामान अंदाज कसे असेल
२४ मार्च ते २९ मार्चदरम्यान विदर्भात हवामान कोरडे राहील.
कोकणातील हवामानाची स्थिती कशी आहे
२४ मार्च ते २९ मार्चदरम्यान कोकणात हवामान कोरडे राहील.
मराठवाड्यात कसे राहील हवामान कसे राहील
आज २४ मार्चपासून रोजी मराठवाड्यात २९ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील हवामान स्थिती कशी असेल
आज २४ मार्च रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर २५ ते २९ मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications