Maharashtra Weather : मुंबई-पुणेसह कोकण, मरावाड्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान कसे राहील
Maharashtra Weather : महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण असून कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने येत्या २२ मे पर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मौसमी वारे वाहणार असल्याने उन्हाळा जवळजवळ संपला आहे असेच म्हणावे लागेल.

एकीकडे उन्हाळा जरी संपत असला तरीही पावसाळी वातावरण आणि उष्ण-दमट वातावरणाची प्रचिती नागरिकांना येत आहे. महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस पडणार हे आपण समजून घेऊया.
कोकण
कोकण परिसरात विशेषत पालघर, रायगड, रत्नागिरीसह मुंबई आणि ठाणे येथे १८ मे रोजी म्हणजेच आज हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबईत तापमानाचा पारा ३३ ते ३५ अंशावर आहे.रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. या भागात वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर इतक्या वेगाने वाहू शकते.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 17, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/ay13At5kms
मराठवाडा
मराठवाड्यातील परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथं आज तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती येथे हवामान दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान ३० ते ४० तर किमान तापमान २५ ते २७ अश सेल्सियस राहू शकतं. या भागात पावसाची शक्यता कमी असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
पश्चिम महाराष्ट्र
सातारा आणि कोल्हापूर येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुणे, सांगलीत आज हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान ३४ ते ३६ तर किमान तापमान २५ अंश सेल्सियस इतके राहण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात पावसाला सुरुवात
सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव,खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यात मेघगर्जनेसह पहाटेपासून सध्या पाऊस पडत आहे.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला. विदर्भात बऱ्याच ठिकाणी, कोकण गोवा व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली आहे.
- विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३४.२, सांताक्रूझ ३४.४. अलिबाग ३५.६. रत्नागिरी ३३.६, पणजी (गोवा) ३५.८. डहाणू ३५.७. पुणे ३३.८. लोहगाव ३७.३. अहिल्यानगर ३३.८, जळगाव ३६.४. कोल्हापूर ३३.५. महाबळेश्वर २४.१, मालेगाव ३५.२, नाशिक ३२.२, सांगली ३४.६, सातारा ३१.७, सोलापूर ३५.२, धाराशिव छत्रपती संभाजीनगर ३४.०, परभणी ३९.३, नांदेड, बीड ३७.२, अकोला ३९.६, अमरावती ३९.४. बुलढाणा ३५.२. ब्रह्मपुरी ४९.७, चंद्रपूर ४१.६, गोंदिया ३९.९, नागपूर ४१.०, वाशिम ३७.४, वर्धा ३९.५, यवतमाळ ३९.०. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४१.७ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.












Click it and Unblock the Notifications