Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गोंधळात गोंधळ: राज्यात कुठे मैत्रीपूर्ण लढत, कुठे झाली बंडखोरी; वाचा एका क्लिकवर संपूर्ण यादी

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. तर 4 नोव्हेबंरला अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. दरम्यान, राज्यात महायुती विरुद्ध महायुती आणि महाविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र देखील काही मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे.

शिंदेंची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रितपणे लढत असली तरी त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांविरोधात नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. त्याला काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती असे म्हटले जात आहे. तर भाजप नेत्यांनी देखील मित्रपक्षांच्या उमेदवाराविरोधात अर्ज भरुन लढत अधिक चुरशीची केलेली पाहायला मिळत आहे.

Mahayuti  MVA

दरम्यान, महाविकास आघाडीतही काही वेगळे चित्र नाही. त्यांच्यात देखील अनेक मतदारसंघात उमेदवारीवरुन वाद पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. तर अनेक मतदारसंघात पक्षांनी रात्रीतून उमेदवाराला पक्षात प्रवेश दिला अन् लगेच तिकीट देखील दिलेत. त्यामुळे राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे.

महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढती

महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी अर्ज भरले आहेत. असे मतदारसंघ राज्यभरात पाहायला मिळत आहेत. त्यातील काही प्रमुख मतदारसंघाची नावे समोर आली आहेत. त्यामुळे नेमकं या ठिकाणी काय होणार हे माघारी अर्ज घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

मिरज विधानसभा

शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते
काँग्रेस - मोहन वनखंडे

सांगोला विधानसभा

शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे
शेकाप - बाबासाहेब देशमुख

दक्षिण सोलापूर विधानसभा

काँग्रेस - दिलीप माने
शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील

पंढरपूर विधानसभा

काँग्रेस भागीरथ भालके
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत

परांडा विधानसभा

शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे

दिग्रस विधानसभा

शिवसेना ठाकरे गट - पवन जैस्वाल
काँग्रेस -माणिकराव ठाकरे

नांदेड विधानसभा

काँग्रेस- अब्दुल सत्तार
शिवसेना उबाठा- संगिता पाटील डक

महायुतीत कुठे मैत्रीपूर्ण लढतीचे चित्र...!

  1. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघ आहे. ज्या ठिकाणी भाजपने उमेश उर्फ चंदू यावलकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
  2. अणूशक्तीनगर शिंदे गट - अजित पवार गट यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. अजित पवारांकडून सना मलिक तर शिंदेंच्या शिवसेनेकडून अविनाश राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. राणेंना शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आला.
  3. आष्टी विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडून बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी.
  4. शिवाजीनगर - मानखुर्दमध्ये देखील मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक - शिवसेनेकडून बुलेट पाटील.
  5. खडकवासल्यातही मैत्रिपूर्ण लढत - भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय धनकवडे
  6. दौंडमध्ये अजित पवार राष्ट्रवादी- विरधवल जगदाळे, भाजप- राहुल कुल यांनी देखील अर्ज भरलेला आहे.
  7. पुरंदर- शिवसेना शिंदे- विजय शिवतारे, अजित पवार राष्ट्रवादी- सनदी अधिकारी संभाजी झेंडे
  8. नाशिक- दिंडोरी- अजित पवार राष्ट्रवादी- नरहरी झिरवाळ, शिवसेना शिंदे- धनराज महाले
  9. नाशिक- देवळाली- अजित पवार राष्ट्रवादी- सरोज अहिरे, शिवसेना शिंदे- राजश्री अहिरराव

महाराष्ट्रात बंडखोरी झालेले मतदारसंघ

विदर्भ-बंडखोरी

  • अमरावती- बडनेरा मतदारसंघ- भाजपचे तुषार भारतीय अपक्ष अर्ज वि. रवी राणा - भाजपचा पाठिंबा
  • दर्यापूर - काँग्रेसचे गुणवंत देवपारे महाविकास आघाडी विरोधात आज बंडखोरी,भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले महायुती विरोधात बंडखोरी
  • यवतमाळ- उमरखेड मतदारसंघात महायुती बंडखोरी, भाजपचे माजी आमदार राजू नजरधने यवतमाळच्या उमरखेड मतदार संघातून मनसेकडून उमेदवारी
  • नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बंडखोरी-राजश्री जिचकार यांनी देखील काटोलमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला
  • उत्तर नागपूर मतदारसंघातून काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या विरोधात जेष्ठ नगरसेवक मनोज सांगोले यांनी बंडखोरी केली
  • पश्चिम नागपूर मधून विकास ठाकरे विरोधात काँग्रेसचे निलंबित नरेंद्र जिचकार यांनी उमेदवारी अर्ज भरला
  • बुलढाणा- सिंदखेड राजात महायुतीत बंडखोरी- भाजपा पदाधिकारी अंकुर देशपांडे यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी, सिंदखेड राजात डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश
  • भंडारा विधानसभा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चेतक डोंगरे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली
  • तुमसर विधानसभा- तुमसर विधानसभेत शरद पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी बंडखोरी करीत नामांकन दाखल केला. तुमसर विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ठाकाचंद मुंगूसमारे यांनी बंडाखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली.
  • साकोली विधानसभा भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी करणारे संघाचे विदेश प्रचारक डॉ सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी करीत त्यांचं नामांकन अर्ज दाखल केला आहे.
  • नंदुरबार- आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी
  • शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले आहे
  • बुलढाणा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी बघायला मिळत आहे याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनोने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
  • वाशिम विधानसभा मतदारसंघ- विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटात मदन उर्फ राजा भैया पवार यांनी शिवसेना उबाठा गटाकडून अधिकृत उमेदवार डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या विरोधात बंडखोरी केली.
  • वाशिम- रिसोड मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भावना गवळी यांच्या विरोधात बंड करत भाजपचे अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.
  • वाशिम- कारंजा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांच्या विरोधात बंडखोरी करत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.
  • अकोला पश्चिम- राजेश मिश्रा, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख. मिश्रा यांनी बंडखोरी केली असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय

पश्चिम महराष्ट्र- बंडखोरी

  • पुणे- वडगाव शेरीतून जगदिश मुळीक अपक्ष अर्ज- सुनील टिंगरेंना अजित पावारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी
  • सोलापूर दक्षिण विधानसभा - सुभाष देशमुख - भाजप उमेदवार वि. बंडखोर - सोमनाथ वैद्य (भाजपतून बंडखोरी करत अपक्ष लढणार)
  • सांगली विधानसभेत काँग्रेस मध्ये तर शिराळा आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी..सांगली विधानसभा मध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज पाटील यांना तिकीट मिळाल्याने जयश्रीताई पाटील यांनी नाराज
  • जतमध्ये भाजपात बंडखोरी... भाजपचे नेते तमनगौडा रवी पाटील लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार

उत्तर महाराष्ट्र- बंडखोरी

  1. नंदुरबार -अक्कलकुवा:-विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी खासदार डॉ हिना गावित यानी बंडख़ोरी केली, ही जागा शिवसेनेला सुटली
  2. नाशिक- चांदवड- भाजपचे डॉ.राहुल आहेर वि. केदा आहेर
  3. धुळे- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाराज झालेल्या हिलाल माळी यांनी बंडखोरीकर आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली आहे तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा दिल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या श्याम सनेर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली.
  4. जळगाव- पारोळा एरंडोल मतदार संघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत यांच्या विरुद्ध भाजपचे माजी खासदार ए.टी नाना पाटील यांनी आज अपक्ष त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील यांनी सुद्धा आज त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
  5. अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हा- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट) (अपक्ष अर्ज दाखल),
  6. शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघ- चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी अजित पवार गट)(अपक्ष अर्ज दाखल)
  7. नाशिक- नांदगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यां विरोधात बंडखोरी करत नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे.
  8. इगतपुरी मतदार संघात महाविकास आघाडीने लकी जाधव यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसच्या माजी आमदार आणि सध्याच्या शिवसेना नेत्या निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली.
  9. महायुतीकडून हिरामण खोसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते काशिनाथ मेंगाळ यांनी बंडखोरी करत मनसेत प्रवेश करून खोसकर यांना आव्हान दिले आहे.
  10. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला.
  11. मालेगाव बाह्य मतदारसंघातून भाजपचे युवा प्रदेश सचिव कुणाल सुर्यवंशी यांनी महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात बंडखोरी केली.
  12. मालेगाव मध्य मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद निहाल अहमद यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार एजाज बेग, अजीज बेग यांच्या विरोधात बंडखोरी केली.
  13. शिंदखेडा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे श्याम सनेर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
  14. शिरपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे.
  15. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादी राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट) (अपक्ष अर्ज दाखल)

कोकण- बंडखोरी

  • सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, भाजपचे प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांचा सावंतवाडीतून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी.
  • सिंधुदुर्ग- भाजप मधून विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष तर शरद पवार राष्ट्रवादी मधून अर्चना घारे परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला.
  • रत्नागिरी- गुहागर- भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांची बंडखोरी.
  • रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघ भाजपाचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी बंडखोरी करत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. महायुतीकडून उदय सामंत यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात धनुष्यबाण आणि मशाल यांच्यात होणार आहे.

मराठवाडा- बंडखोरी

  1. बीड- पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, आष्टी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या ऐवजी या ठिकाणी भाजपला ही जागा सोडण्यात आली आणि भाजपकडून सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर बाळासाहेब आजबे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
  2. हिंगोली- हिंगोली विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी रूपाली पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर यांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे आघाडीमध्ये परंपरागत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असतो.
  3. वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे चंद्रकांत नवघरे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीकडून उमेदवारी दिली असताना शिवसेनेचे राजू चापके भाजपच्या उज्वला तांबाळे आणि भाजपचे नेते मिलिंद यंबल यांनी अपक्ष उमेदवारी भरली

मुंबई- नवी मुंबई- बंडखोरी

  1. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- शिंदे गटात बंडखोरी- स्वीकृति शर्मा वि. मुरजी पटेल.
  2. मुंबई- महायुतीत वांद्रे पूर्वे विधानसभेत बंडखोरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली माञ शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष लढणार.
  3. नवी मुंबई - बेलापुर विधानसभेत महाविकास आघाडीत बंडखोरी. संदीप नाईक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने मंगेश आमले भरणार अपक्ष अर्ज
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+