आजपासून विशेष अधिवेशन, दोन दिवस आमदारांचा शपथविधी त्यानंतर होईल विधानसभा अध्यक्षांची निवड
MLAs oath Taking Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर आता आमदारांच्या शपथविधीसाठी शनिवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु होणार आहे.
शनिवारी आणि रविवारी 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल. नव्या आमदारांना शपथ देण्यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात येईल. ते सर्व आमदारांना शपथ देतील.

दोन दिवसांत नव्या आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा भाजप नेते राहुल नार्वेकर यांचीच वर्णी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यंदाच्या विधानसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची संख्या 78 इतकी आहे.
महायुतीत खातेवाटपावरुन चर्चा सुरू
एकीकडे आमदारांच्या शपथविधीची लगबग सुरु असताना दुसरीकडे महायुतीच्या गोटात मंत्रिमंडळातील खातेवाटबाबात खलबते सुरु आहेत. शनिवारी यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं आणि कोणती खाती येणार, याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications