Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Assembly Election 2024 : मुंडे, भूजबळ, ठाकरेंसह हे मोठे नेते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : विधानसभा निवडणूकीचं बिगूल वाजलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलं आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाने आपली पहिली यादी जाहीर करुन प्रचारात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षामध्ये 85-85-85 असा जागांचा फॉर्म्यूला ठरला असून अजून 18 जागांच वाटप बाकी आहे.

आज राज्यातील काही मोठे नेते आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे स्वत : आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे.

Mahavikas Aghadi On Mahayuti

परळी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि कृषमीमंत्री धनंजय मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 11 वाजल्यानंतर मुंडे अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे हजर राहणार आहेत.

येवला - या मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठे नेते छगन भुजबळ हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कळवा-मुंब्रा - विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार असून स्वत: शरद पवार यावेळेस उपस्थित राहणार आहेत.

वरळी - ठाकरे गटाचे नेते आणि उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्यासोबत यावेळेस आई रश्मी ठाकरे आणि वडील उध्दव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ठाणे शहर - ठाण्याचे मनसेचे फायरब्रॅंड नेते अविनाश जाधव हे आज ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असून मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वत :अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

ठाणे शहर - ठाणे शहर मतदारसंघासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

कोथरुड - भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आंबेगाव - मंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

इंदापूर - इंदापूर विधानसभा मतदारसंघातून नुकतेच भाजपातून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलेले नेते हर्षवर्धन पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिर्डी- शिर्डी विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत.

भोर- संग्राम थोपटे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. थोपट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कॉंग्रेसचे प्रदेशध्याक्ष नाना पटोले आणि खा. सुप्रिया सुळे या उपस्थितीत राहणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+