ठाणेकरांनो सावधान..! अवघ्या काही दिवसातच आढळले स्वाइन फ्लू ची तब्बल 70 रुग्ण, काळजी कशी घ्याल?

ठाणे शहरांमध्ये अवघ्या काही दिवसातच स्वाइन फ्लू ची तब्बल 70 रुग्ण आढळून आली आहेत, त्यामुळे ठाणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये ठाणे शहरांमध्ये संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त 87 रुग्ण आढळून आले होते. मात्र यावर्षी जून महिन्यापासून अवघ्या काही दिवसातच स्वाइन फ्लू(H1N1) ची तब्बल 70 रुग्ण आढळून आले आहेत.

swine flu in Thane

ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेतली. कोणत्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा साठा कमी पडू नयेत याची काळजी घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी अशा सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

खबरदारीचा उपाय म्हणून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये स्वाईन फ्लू च्या रुग्णांसाठी विशेष कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती ठाणे महानगरपालिका माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली आहे.

स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे?

  • पोटात दुखणे,मळमळ होणे किंवा उलटी होणे.
  • अंगदुखी,डोकेदुखी.
  • थंडी वाजणे,ताप येणे, नाक वाहत राहणे.
  • खोकला आणि घशात खवखव होणे किंवा दुखणे.

विशेष काळजी कोणी घ्यावी?

  • गरोदर स्त्रिया,
  • पाच वर्षाच्या आतील मुले.
  • 65 वर्षाच्या वरील वृद्ध माणसे.
  • एच.आय.व्ही.लागण असलेली व्यक्ती.
  • मधुमेह, दमा,हृदयविकार इ. आजार असणाऱ्या व्यक्ती.
  • व्यक्तींना स्वाइन फ्लू होण्याचा धोका जास्त असतो.

स्वाइन फ्लू रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

  • खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल वापरावा.
  • सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • भरपूर पाणी प्यावे,संतुलित आहार घ्यावा.
  • नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत.
  • सॅनिटायझर चा वापर करावा.
  • लक्षणांची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+