उन्हाच्या कडाक्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता! जाणून घ्या राज्यात पावसाची स्थिती आणि तापमान
Maharashtra Temperature : मार्च महिना अर्धा संपला असून आता उष्णतेच्या झळा बसत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भात नेहमीप्रमाणे यंदाही तापमान वाढलेले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान ब्रम्हपुरी तर सर्वात कमी जळगाव येथे नोंदवले गेले आहे. विशेष म्हणजे ऐन उन्हाच्या कडाक्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान कसे होते?
गेल्या 24 तासांतील पर्जन्यमानः गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

कुठे सर्वात जास्त तापमान कुठे सर्वात कमी?
हवामान विभाग पुणे आयएमडी (IMD Pune) राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे 41.5 अंश सेल्सियस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे 15.9 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. आज विदर्भात आज 14 मार्च 2025 रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोंकण गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तापमान
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल किमान तापमान (अंश सेल्सिअस) खालीलप्रमाणे :
मुंबई (कुलाबा) 31.5/24.6, सांताक्रूझ 32.8/22.1, अलिबाग 30.9, रत्नागिरी 32.6/20.7, डहाणू 34.9/20.5, पुणे 38.7/18.1, लोहगाव 40.3/22.7, अहिल्यानगर 19.3, जळगाव 38.2/15.9, कोल्हापूर 36.8/22.3, महाबळेश्वर 33.0/18.8, मालेगाव 39.4/18.8 नाशिक 37.5/18.2, सांगली 39.0/22.3, सातारा 39.2/20.4, सोलापूर 40.4/25.0, धाराशिव 21.8, छत्रपती संभाजीनगर 37.7/22.4, परभणी 39.3/22.0, बीड 22.2, अकोला 40.1/ 23.7, अमरावती 39.6/20.5, बुलढाणा 38.0/24.6, ब्रह्मपुरी 41.5/ 22.5, चंद्रपूर 41.2/, गोंदिया 37.0/20.4, नागपूर 39.0/21.6, वाशिम 40.2, वर्धा 44.0/22.0, यवतमाळ 39.6 /23.6
विदर्भात पावसाची स्थिती आणि हवामान
- 19 मार्च - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
- 20 मार्च - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
- 21 मार्च - काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारा पडण्याची शक्यता.
- 22 मार्च - तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व गारा पडण्याची शक्यता.
- 23 मार्च - हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
- 24 मार्च - हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
- 25 मार्च - हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
कोकणातील हवामानाची स्थिती
- कोकणात 19 ते 25 मार्चदरम्यान पुर्णतः हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात कसे राहील हवामान अन् पावसाची स्थिती
- मध्य महाराष्ट्रात 20 आणि 23 मार्च रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे तर 21, 22, 24, 25 मार्चला हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात कसे राहील हवामान?
- 19 ते 22 मार्चदरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून 23 ते 25 मार्चदरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications