Maharashtra Temperature: विदर्भात उष्ण लाटेचा अंदाज अकोल्यात सर्वात जास्त, पुण्यात सर्वात कमी तापमान
Maharashtra Temperature Updates : उन्हाळ्याचे दिवस जसे जसे पुढे जात आहेत तसे तसे तापमान वाढत असून आतापासूनच उष्णतेच्या झळा बसत आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भात नेहमीप्रमाणे यंदाही तापमान वाढलेले आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला आणि त्यानंतर नागपूरमध्ये नोंदवले गेले आहे.
हवामान विभाग पुणे आयएमडी (IMD Pune) राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे 41.3 अंश सेल्सियस तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे 18.4 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर विदर्भात आज 14 मार्च 2025 रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात या आठवड्यात कसे राहणार तापमान?
13 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट
14 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता. विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
15 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
16 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
17 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
18 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.
19 मार्च
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता.

Maharashtra Weather : हवामान; ठळक घडामोडी
- गेल्या 24 तासांतील पर्जन्यमानः गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते.
- कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
- विदर्भात बऱ्याच ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
- कोकण कोव्यात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
- विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल किमान तापमान (अंश सेल्सिअस)
- मुंबई (कुलाबा) 37.0/25.4 सांताक्रूझ 38.6/24.0
- अलिबाग /20.5
- रत्नागिरी 38.4/23.7
- पणजी (गोवा) 36.8/24.6
- डहाणू 34.8/22.8
- पुणे 38.2/18.4
- लोहगाव 40.2/22.9
- अहिल्यानगर /18.5
- जळगाव 39.4/19.5
- कोल्हापूर 36.5/21.9
- महाबळेश्वर 32.1/20.1
- मालेगाव 38.5/21.8
- नाशिक 38.7/19.6
- सांगली 38.1/20.8
- सातारा 37.9/18.6
- सोलापूर 39.4/22.6
- धाराशिव/19.4
- छत्रपती संभाजीनगर 38.2/22.0 परभणी 39.1/23.3
- बीड 19.5
- अकोला 41.3 /22.3
- अमरावती 39.8/21.1
- बुलढाणा 38.2/23.6
- ब्रम्हपुरी 40.4/-
- चंद्रपूर 40.6/-
- गोंदिया 38.2/19.8
- नागपूर 40.2/19.4
- वाशिम 39.8/-
- वर्धा 40.0/21.5
- यवतमाळ 40.0 /22.4












Click it and Unblock the Notifications