महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा; दिग्गजांचा सन्मान, वाचा पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
मुंबईत नुकताच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार (Maharashtra State Film Awards) सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्याला हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. यावर्षी विविध श्रेणींमध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

प्रतिष्ठेचे जीवनगौरव पुरस्कार
- राज कपूर जीवनगौरव पुरस्कार: ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- राज कपूर विशेष योगदान पुरस्कार: हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजोल यांना गौरवण्यात आले. त्यांनी मराठीमध्ये आपले मनोगत व्यक्त केले, ज्यामुळे प्रेक्षकांकडून त्यांना विशेष दाद मिळाली.
- व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार: प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.
- व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार: अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना त्यांच्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार: गझलकार पंडित भीमराव पांचाळे यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट: धर्मवीर
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: प्रवीण तरडे (धर्मवीर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: प्रसाद ओक (धर्मवीर)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अमृता खानविलकर (चंद्रमुखी) आणि सई ताम्हणकर (पाँडिचेरी)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: योगेश सोमण (अनन्या)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मनीष राजगिरे (भेटला विठ्ठल - धर्मवीर)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: आर्या आंबेकर (बाई गं - चंद्रमुखी) आणि अमिता घुगली (तुला काय सांगू कैना)
६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची यादी
- सर्वोत्कृष्ट चित्रपट: भेरा
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: श्रीकांत प्रभाकर (भेरा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: अमेय वाघ (जग्गू आणि ज्युलिएट)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: रिंकु राजगुरू (आशा)
- उत्कृष्ट बालकलाकार: त्रिशा ठोसर (नाळ 2) आणि कबीर खंदारे (जिप्सी)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: संतोष जुवेकर (रावरंभा)
- सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: उषा नाईक (आशा)
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक: अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)
हीरक महोत्सवी सोहळ्याचे आयोजन
यावर्षी हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात 60 व्या आणि 61 व्या वर्षातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यासोबतच सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025 चीही घोषणा करण्यात आली.












Click it and Unblock the Notifications