ऐन सणासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, प्रवाशांना मोठा फटका
मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पहिला दिवस आहे. एसटी कर्मचारी आंदोलनाला बसल्यामुळे याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. या आंदोलनामुळे राज्यभरात एसटी बस बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे
गणेशोत्सवाच्या तोंडावर संप पुकारल्याने भाविकांचे हाल होणार आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने एसटी कर्मचा-यांने संप पुकारल्याने प्रवाशांची चिंता वाढली आहे. या आंदोलनाचा फटका गावागावत जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते.
अनेक प्रवाशांनी गणेशोत्सवासाठी एसटीचे आरक्षणदेखील केले आहे. अशातच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी राज्यभरात तीव्र निदर्शन करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला. यानंतर आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

एसटी कामगारांच्या काय आहेत मागण्या ?
एसटी कामगारांच्या आर्थिक व महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे,खाजगीकरण बंद करा,सुधारीत जाचक शिस्त, आवेदन कार्यपद्धती रद्द करा,इनडोअर, आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा
जुन्या झालेल्या बस काढून टाका,स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचा-यांना अद्ययावत विश्रांतीगृह द्या.वेळापत्रकातील त्रुटी दूर करा.सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्ती वेतन द्या.सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणापत्रानुसार दुरूस्ती करा.एसटी कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये वर्षभराचा मोफत पास द्या याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन केले जात आहे.












Click it and Unblock the Notifications