SSC Result : 10वीचा निकाल 'या' तारखेच्या आधी जाहीर होणार! निकाल कोठे अन् कसा बघायचा? जाणून घ्या
Maharashtra SSC HSC Results : दहावी, बारावीच्या निकाल कधी लागणार याचा विद्यार्थ्यांमध्ये मोठा सम्रंभ होता आणि पालकांनाही त्यांच्या पाल्याच्या निकालाची काळजी लागलेली आहे. आता या संदर्भात शिक्षण मंडळाने स्पष्ट केले की, बारावीचा निकाल 5 मे रोजी लागणार आहे उद्या दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे, तर दहावीचा निकाल 15 मे च्या आत निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. आता या परिक्षांचे निकाल कधी लागतील याचेच वेध विद्यार्थ्यांना होते, पण बारावीच्या परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे आता दहावीच्या परिक्षांचे निकाल कधी लागणार याचीच मुलांना उत्सुकता आहे.

एवढ्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा
दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्रातील नऊ विभागांमध्ये - पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक आणि कोल्हापूर येथे परीक्षा घेण्यात आल्या. जवळपास 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान 5,130 हून अधिक केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.
- दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात 8 लाख 64 हजार 120 मुलं आणि 7 लाख 47 हजार 471 विद्यार्थिनी होत्या, तर 19 तृतीयपंथी विद्यार्थी होते.
- बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान झाल्या.बारावीच्या परीक्षेत 15 लाख 13 हजार 909 उमेदवारांपैकी 8 10,348 मुले, 6,94,652 मुली आणि 37 तृतीयपंथी आहेत.
बारावीचा निकाल उद्या, दहावीचे निकाल कधी जाहीर होणार?
आधीच्या अहवालांनुसार, ताज्या अहवालांमध्ये बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार म्हणून सांगण्यात आले आहे तर दहावीचा निकाल येत्या अकरां दिवसांत जाहीर होतील. दहावीच्या निकालांचे मूल्यांकन आणि संकलन अंतिम टप्प्यात असून त्यामुळे, बोर्ड मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे च्या आत दहावीचा निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
Maharashtra SSC, HSC Result 2025 निकाल कुठे पाहायचा? अधिकृत वेबसाइट
- mahahsscboard.in
- mahresult.nic.in
- hscresult.mkcl.org
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
- sscresult.mkcl.org
- hsc.mahresults.org.in
महाराष्ट्र SSC, HSC Result 2025 निकाल कसा बघायचा?
- सर्वात आधी mahresult.nic.in ला भेट द्या.
- "महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025" लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव (प्रवेशपत्रानुसार) एंटर करा.
- "निकाल पहा" वर क्लिक करा.
- तुमचा महाराष्ट्र बोर्ड निकाल 2025 तुम्हाला दिसेल.
- निकाल तुमचाच आहे का हे याची पडताळणी करा.
- पुढच्या शैक्षणिक प्रक्रियेसाठी निकाल डाऊनलोड करा किंवा स्क्रीनशॉट घ्या.
मागच्या वेळी कधी लागला होता निकाल?
मागच्या वर्षी 2024 मध्ये इयत्ता 12 वीचा निकाल 21 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. इयत्ता 10 निकाल 2024 27 मे 2024 रोजी जाहीर झाला होता.












Click it and Unblock the Notifications