10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर; यंदा परीक्षा 'दोन आठवडे' लवकर, जाणून घ्या तारखा!
Maharashtra SSC and HSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ मधील दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि परीक्षा लवकर संपवण्यासाठी मंडळाने यंदाच्या वर्षी सुद्धा दोन्ही बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या नऊ विभागनिहाय होतील परीक्षा
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.

१. बारावी (HSC) बोर्ड परीक्षा २०२६
- बारावीची परीक्षेची सुरुवात - २३ जानेवारी २०२६ ते ०९ फेब्रुवारी २०२६
- लेखी परीक्षा - सुरुवात - १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६
- ऑनलाईन परीक्षा - (लेखी परीक्षेसोबत) माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांसाठी.
- बारावीची लेखी परीक्षा - मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल आणि बुधवार १८ मार्च २०२६ रोजी संपेल.
२. दहावी (SSC) बोर्ड परीक्षा २०२६
- सुरुवात - ०२ फेब्रुवारी २०२६ ते १८ फेब्रुवारी २०२६
- लेखी परीक्षा सुरुवात - २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६
- प्रात्यक्षिक परीक्षा - (यात समाविष्ट) शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र
- दहावीची लेखी परीक्षा - शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल आणि बुधवार १८ मार्च २०२६ रोजी संपेल.
परीक्षेत लवकर होण्याचे कारण
दरवर्षी बारावीची परीक्षा साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होते, तर दहावीची परीक्षा मार्च महिन्यात सुरू होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा आणि त्यांना पुढील अभ्यासासाठी वेळ मिळावा, या हेतूने मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करत त्या दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशीलवार वेळापत्रक लवकरच
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) या दोन्ही परीक्षांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असल्या तरी, विषयानुसार सविस्तर आणि अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.












Click it and Unblock the Notifications