महाराष्ट्रात पुढचे 48 तास महत्वाचे..! या भागात कोसळणार जोरदार सरी, जाणून घ्या आज, उद्याचे हवामान
Maharashtra Rainfall in Marathwada Vidarbha Konkan in today : महाराष्ट्रात पावसाचे दिवस असून जोरदार सरींनी राज्याला ओलचिंब केलं आहे. या पावसाने राज्यातील शेतकरी सुखावला असून आगामी जुलै महिना पावसाचाच राहणार आहे. तर पुढचे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कसे राहील आज आणि उद्याचे हवामान
आज जालना, परभणी तर उद्या धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या रत्नागिरी, पुणे व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना यलो देण्यात आलेला आहे तर उर्वरित राज्यात पुढील 48 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुणे
पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून आज अति हलक्या स्वरूपाचा व उद्या व परवा हलक्या स्वरूपाचा पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मुंबई
मुंबईमध्ये मान्सूनचा दीर्घकाळ कमकुवत कालावधी राहील अशी शक्यता हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील आठवड्यात मुंबई शहर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे. संपूर्ण आठवड्यात मुंबई शहरात मध्यम आणि मुसळधार पाऊस पडला नाही.
कोकण
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण गोव्यामध्ये पुढील काही दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आज आणि उद्याही पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
मराठवाडा
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे असे मुंबई आयएमडीने म्हटले आहे.
विदर्भ
विदर्भात 48 तासांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 48 तासात अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघर्जना, विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मध्य महाराष्ट्रात त्यानंतर पुढील काही दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications