मोठी बातमी! राज्यात पावसाचा जोर ओसरला; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात 6 ऑगस्टपर्यंत कसा असेल पाऊस?
Maharashtra Rain Yellow Alert for Vidarbha including Nagpur : राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 2 आठवड्यात मान्सून सर्क्युलेशन क्षीण असण्याची शक्यता असल्याने हा परिणाम आहे, त्यामुळे मध्य भारतातील काही भागात व राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता नागपूर हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पुढच्या दिवसात परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यताही हवामान विभागाने म्हटले आहे.
आज महाराष्ट्रात कसे राहील हवामान?
आज 1 ऑगस्ट रोजी कोकण व गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलकाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज कोकणात पावसाची स्थिती कशी असेल?
आज कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे, यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील स्थिती काय?
आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
विदर्भात आज येलो अलर्ट
आज एक ऑगस्ट रोजी विदर्भातील, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात सर्व ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली, म्हणून विदर्भातील या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात कसे राहील हवामान?
आज पुणे आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून अति हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
आयएमडीनुसार, 2 ते 6 ऑगस्टपर्यंत कसे राहील हवामान?
2 ऑगस्टला पावसाची स्थिती
कोकणात 2 ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
3 ऑगस्टला पावसाची स्थिती
कोकणात 3 ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल याशिवाय तुरळक ठिकाणी विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
4 ऑगस्टला पावसाची स्थिती
कोकणात 4 ऑगस्टला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल याशिवाय तुरळक ठिकाणी विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
5 ऑगस्टला पावसाची स्थिती
कोकणात 5 ऑगस्टला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
6 ऑगस्टला पावसाची स्थिती
कोकणात 6 ऑगस्टला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.












Click it and Unblock the Notifications