राज्यात रात्रभर पाऊस, नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी मुसळधार, 1 जण बुडाला, गोदावरीला पूर, धरणातून विसर्ग
Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात रात्रभर रिमझिम पाऊस झाला असून आताही (सकाळी सहा वाजता) काही भागात हलका पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला असून सुरगाणा येथे एकजण वाहून गेला आहे तर दुसरीकडे गोदावरी नदीला पूर आला आहे.
राज्यात गत दोन-तीन दिवसांपासून बहुतांश भागात पाऊस (rain) होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा ंमिळाला असून पावसामुळे शेतीपिकाला मोठा आधार आणि भुजल साठ्यातही मोठी वाढ झाली आहे.

नाशिक अपडेट्स : एकजण बैलासह वाहून गेला
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (rain) नदी नाले भरून वाहू लागले असून, सुरगाण्यात आलेल्या पुरात एक शेतकरी बैलासह वाहून गेला. किसन बन्सी पिठे असे या शेतकऱ्याचे नाव असून नदी किनाऱ्याजवळ त्याचा मृतदेह सापडला.
गंगापूर धरणातून विसर्ग
जिल्ह्यातील बहुतांश धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळी 7,431 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. त्यातच शहरात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने गोदावरी नदीला यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा पूर आला आहे.
दुतोंड्या मारुती मुर्तीच्या मानेपर्यंत पाणी
रामसेतू वरून पाणी वाहत असून रात्री नदी पात्रात असलेल्या दुतोंडया मारूती मूर्तीच्या माने पर्यँत पाणी आले होते. गोदावरी नदीच्या इशारा पातळी पर्यँत पाणी आल्याने नाशिक महापालिकेने गोदा काठच्या नागरिकांना तातडीने स्थलांतरित व्हावे असे आवाहन केले आहे.
आज सायंकाळपर्यंत त्र्यंबकेश्वर इथं 106 मिमी पावसाची नोंद झाल्याने तेथे अतिवृष्टीची नोंद करण्यात आली, तर इगतपुरी येथेही दिवसभरात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून रात्री 9 नंतर 30 हजार 169 क्युसेक विसर्ग करण्यात येत होता, तर पालखेड धरणातून रात्री 9 वाजता कादवा नदीमध्ये 830 क्युसेकने पाणी विसर्ग प्रवाहित करण्यात येत आहे.
नांदेड अपडेट्स
नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले
नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्प ९98 टक्के भरला आहे. प्रकल्प क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाण्याचा येवा वाढला आहे. त्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे शनिवारी सायंकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications