Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी : पुढच्या 4 तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस ! जाणून घ्या आताची अपडेट

Maharashtra Weather : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आगमन झाले असून पुढील चार तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विजांसह पावसाची शक्यता (जिल्हे):

जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर,धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर

Maharashtra Weather Yellow alert issued for rain in many districs

शेतक-यांना मिळणार दिलासा

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने प्रचंड उकाडा वाढला होता. आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू मिळाला आहे, तसेच राज्याच्या ग्रामीण भागात पावसानं दांडी मारल्यानं शेतकरी देखील चिंताग्रस्त झाले होते पण पाऊस परतल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्याच्या अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट जारी

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट तर उत्तर महाराष्ट्रासह मुंबई ठाणे पालघर वगळता संपूर्ण राज्याच आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी पावसाची राज्यात दमदार हजेरी

राज्यातील अनेक भागांत पावसाने शनिवारी दमदार हजेरी लावली, महाबळेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला तसेच सातारा सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळला, पुण्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते, आज रविवारीही जोरदार हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रेड अलर्ट

कुलाबा हवामान विभागानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांकरिता Red Alert जारी केला आहे. सध्या जिल्ह्यात हवामान ढगाळ असून काही ठिकाणी पाऊसही पडत आहे. दरम्यान आज सकाळी काही भागात चांगला पाऊस झाला आहे. नागरिकांनी दरम्यानच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी अशा सुचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी पावसाच्या आणि पुराच्या परिस्थितीबाबत अपडेट्स द्याव्या अशा सुचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

सांगलीत जोरदार पाऊस

सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह आज जोरदार पाऊस झाला. सकाळपासून हवेत उकाडा जाणवत होता. दुपारी आलेल्या पावसामुळे नद्या नाले तुडूंब भरले आहेत. शहरासह अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साठलं. अचानक आलेल्या पावसामुळ नागरिकांची धावपळ उडाली असून प्रशासन सर्व बाजूने पावसाचा सामना करण्यासाठी तयार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+