राज्यात अनेक भागात परतीचा पाऊस, नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज, धुळे, अहमदनगरला रेड अलर्ट!
Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून कालपासून पावसाने झोडपून काढले आहे. राज्यात अनेक भागात सर्वदूर पाऊस झाला असून नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा अंदाज असून या जिल्ह्यासह धुळे, अहमदनगरला हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील काही भगात पडत असलेल्या पावसाचा फटका जनजीवनाला बसत आहे तर दुसरीकडे मुंबई, पुण्यातही पाऊस होत आहे. आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 23 ऑक्टोबरपर्यंत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल. धुळे, अहमदनगर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.

असा आहे अंदाज आणि रेड अलर्ट
17 ते 23 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस कोसळणार आहे तर वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. आज धुळे, नाशिक, अहिल्यानगर जिल्यात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर राज्यात वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरीची पडण्याची शक्यता आहे.
येलो अलर्ट
हवामान विभागाने कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रावमह, रत्नागिरी, निधुदुर्ग जिल्यात वावळी वान्यासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, अरा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये स्थिती काय?
- नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस
- काही भागात ढगफुटी झाल्याचा अंदाज
- चांदवडला बंधारा ओव्हर फ्लो, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
नाशिक शहरासह जिल्ह्यात सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. चांदवड तालुक्यातील राहुड बंधारा ओव्हर फ्लो झाल्यामुळे झाल्यामुळे परिसरातील तीन ते चार गावांना धोका निर्माण झाला त्यामुळे येथील कुटुंबांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले आहे.
नाशिकच्या काही गावांमध्ये जोरदार पाऊस असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे तसेच नाशिकचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय साधला जात आहे गरज पडल्यास पुढील उपाययोजना करण्यात येतील असं माध्यमांशी बोलताना सांगितलं. चांदवड तालुक्यातच मुसळधार पावसामुळे दोन पाझर तलावांचे नुकसान झाले असून परिसरात पाणी शिरले.
देवळा भागातही प्रचंड पाऊस
देवळा भागातही प्रचंड पाऊस झाला असून वडबारे येथील तांबडे हे बंधारासदृश्य धरण फुटल्याचे सांगण्यात येत आहे अर्थात यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नसला तरी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा, कळवण,मालेगाव त्रंबकेश्वर,बागलाण, नाशिक, मनमाड या सर्वच भागात सायंकाळ नंतर जोरदार पाऊस सुरू असून रात्री दहा वाजेनंतर जोर वाढल्याने रस्त्यावर नद्या वाहत आहेत. अनेक भागात पाच ते सहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता. नाशिक शहरात रात्री 10 ते साडे 11वाजेपर्यंत 26.2 मिमी पाऊस झाल्याची नोंद येथील हवामान निरीक्षण केंद्रात झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यासाठी ''ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ''ऑरेंज अलर्ट'' जारी करण्यात आलेला आहे तसेच 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
नागरिकांना दक्षतेच्या सूचना
अहमदनगर जिल्ह्यासाठी ''येलो अलर्ट'' जारी करण्यात आलेला आहे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications