मान्सून येतोय! आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती जाणून घ्या
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून लवकरच येणार असून कमी दाबाचा पट्टा कोकण किनारपट्टी ओलांडत आहे. आज महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यामध्ये कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असून यादरम्यान मराठवाड्यात मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात सध्या हवामान ढगाळ आहे.

दक्षिण कोकण किनाऱ्यावरील कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत ताशी १८ किमी वेगाने जवळजवळ पूर्वेकडे सरकला, तो ११.३० ते १२.३० तासांच्या दरम्यान रत्नागिरीजवळील दक्षिण कोकण किनाऱ्यावर ओलांडला आणि २४ मे २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मध्य महाराष्ट्रावर १७.१° उत्तर अक्षांश आणि ७४.३° पूर्व रेखांशावर, सांगली (महाराष्ट्र) पासून सुमारे ४० किमी वायव्येस, रत्नागिरी (महाराष्ट्र) पासून १०० किमी पूर्वेस आणि सातारा (महाराष्ट्र) पासून १४० किमी पूर्व-नैऋत्येस केंद्रित झाला. सध्या हा पट्टा दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकातून जवळजवळ पूर्वेकडे सरकत आला असून हळूहळू कमकुवत होऊन एका स्पष्ट कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
काल मान्सून केरळमध्ये दाखल
मान्सूनने 24 मे रोजी केरळात प्रवेश केला. 2009 नंतर मान्सून पहिल्यांदाच केरळमध्ये यंदा लवकर पोहचला आहे. 2009 मध्ये मान्सून केरळमध्ये 23 मे रोजी पोहचला होता. आता मान्सून केरळ किनारपट्टीवरुन सरकरत सरकत कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टीवर येत आहे.
महाराष्ट्रात कधी येणार मान्सून
महाराष्ट्रात मान्सून आगामी दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्रात येणार आहे. आंध्र-कर्नाटक आणि कोकणच्या भागात मान्सून प्रवेश करणार आहे.
ठळक घडामोडी
- नैऋत्य मान्सून आज २४ मे, २०२५ रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे.
- गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानः कोकणात तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
- कोकण, मराठवाडा व विदर्भात बर्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला.
- कोकण गोव्यात काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३२.२. सांताक्रूझ ३४.०. अलिबाग ३२.३. रत्नागिरी २६.६, पणजी (गोवा) २७.२. डहाणू ३४.९, पुणे २६.६. लोहगाव २७.५. अहिल्यानगर २५.०. जळगाव ३४.१. कोल्हापूर २४.८. महाबळेश्वर १९.२. मालेगाव ३५.०. नाशिक ३०.२, सांगली २६.६, सातारा २५.६. सोलापूर ३२.७. धाराशिव छत्रपती संभाजीनगर ३१.२, परभणी ३२.२, नांदेड, बीड ३१.८, अकोला ३३.६, अमरावती ३३.६. बुलढाणा २८.३. ब्रह्मपुरी ३३.८. चंद्रपूर ३३.०. गोंदिया ३४.२. नागपूर ३४.०. वाशिम ३१.०, वर्धा ३४.०, यवतमाळ ३३.०. अंश सेल्सियस.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव येथे ३५.० अं. से. नोंदवले गेले.












Click it and Unblock the Notifications