Maharashtra Rain: राज्यातील 6 जिल्ह्यात येलो अलर्ट! महालक्ष्मी सणाच्या काळात आज, उद्या कसा असेल पाऊस
Maharashtra Rain Today : महाराष्ट्रात रिमझिम पाऊस सुरुच असून आज १ सप्टेंबरला कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या भागात आज येलो अलर्ट
आज पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुणे कोल्हापूर व साताऱ्याच्या घाट परिसरात तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कसे राहील हवामान?
मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथेही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात कसे राहील हवामान?
पुणे व परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश सामान्यः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे:
पुढील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
- पालघर
- रायगड
- रत्नागिरी
- सिंधुदुर्ग
- पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसर
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa and in Ghat areas of South Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 31, 2025उद्या २ सप्टेंबर २०२५ कशी राहील पावसाची स्थिती
कोकण: बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
मराठवाडा: तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ: काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काल कुठे कसा पाऊस पडला?
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान: महाराष्ट्रातील पावसाची स्थिती
गेल्या २४ तासांत (१ सप्टेंबर) महाराष्ट्राच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहे:
कोकण आणि गोवा (१ सेंमी पेक्षा जास्त):
रत्नागिरी जिल्हा: राजापूर (४.८ सेंमी), संगमेश्वर (३.८ सेंमी), वैभववाडी (३.६ सेंमी), वाकवली (२.९ सेंमी), चिपळूण (२.१ सेंमी), देवरुख (१.८ सेंमी).
सिंधुदुर्ग जिल्हा: सावंतवाडी (३ सेंमी), कुडाळ (१.३ सेंमी).
गोवा: पेडणे (२.३ सेंमी), पणजी (२.२ सेंमी).
रायगड जिल्हा: सुधागड (२ सेंमी), महाड (१.८ सेंमी).
इतर ठिकाणी: पालघर, डहाणू, कर्जत, मुरबाड, ठाणे (१.५-१.७ सेंमी).
मध्य महाराष्ट्र:
कोल्हापूर जिल्हा: गगनबावडा (८.२ सेंमी), राधानगरी (३.४ सेंमी), गारगोटी (२.३ सेंमी).
सातारा जिल्हा: महाबळेश्वर (७.८ सेंमी), पाटण (४.८ सेंमी).
पुणे जिल्हा: लोणावळा (१.८ सेंमी), खेड (१.३ सेंमी), जुन्नर (०.९ सेंमी).
इतर ठिकाणी: अमळनेर (३.४ सेंमी), माळेगाव (१.३ सेंमी).
मराठवाडा:
परभणी जिल्हा: पाथरी (३.३ सेंमी), पूर्णा (०.८ सेंमी).
जालना जिल्हा: जाफराबाद (२.१ सेंमी).
छत्रपती संभाजीनगर जिल्हा: सिल्लोड (२.८ सेंमी), खुलताबाद (२.५ सेंमी), पैठण (२ सेंमी).
नांदेड जिल्हा: हिमायतनगर (०.७ सेंमी), अर्धापूर (०.३ सेंमी).
इतर ठिकाणी: गोकर्णा, वाशी, उमरी, उमरगा (०.२-२.७ सेंमी).
विदर्भ:
बुलढाणा जिल्हा: सिंदखेड राजा (१.३ सेंमी).
इतर ठिकाणी: उमरी, तिरोडा, गोरेगाव (१-१.७ सेंमी).
घाटमाथा (प्रामुख्याने घाट परिसरात):
- कोयना (गोळवली): ४.५ सेंमी
- ताम्हिणी: ३.५ सेंमी
- आंबोळी: ३.९ सेंमी
- लोणावळा (टाटा): ५.२ सेंमी
- इतर ठिकाणी: इगतपुरी, मिरा, राधानगरी (०.८-२.३ सेंमी).












Click it and Unblock the Notifications