Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2 दिवस मुंबई, कोकणात जोरदार सरी कोसळणार, इतर जिल्ह्यात पावसाची स्थिती काय? घ्या जाणून

Maharashtra Rain today : महाराष्ट्रात येत्या २७ जूनपर्यंत पावसाची बरसात कायम राहणार असून आज २२ जून आणि उद्या २३ रोजी कोकणसह किनारपट्टीजवळ जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात सर्वदुर पावसाचे वातावरण असतानाच मुंबईत पावसाचा जोर आहे, आयएमडीच्या अंदाजानुसार, आठवड्यातील उर्वरित दिवस ढगाळ आकाश आणि पावसाचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. आज २२ जून रोजी अधूनमधून सरी येतील. आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे २३ आणि २४ जून रोजी सतत पाऊस पडण्याची शक्यता आहे, संपूर्ण कालावधीत तापमान २५°C ते ३२°C दरम्यान राहील.

Maharashtra Rain Today

मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात स्थिती कशी राहील..

  • आयएमडीच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मुंबई मध्य महाराष्ट्राच्या तुलनेक कमी पाऊस पडणार आहे.
  • उर्वरित महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत चांगल्या सरी कोसळतील. यामध्ये कोकण , किनारपट्टी येथे जोरदार सरी कोसळतील तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस होईल तर काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज आहे.
  • विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा आयएमडीचा अंदाज आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस

  • कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
  • मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला.
  • कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.
  • मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या २४ तासांत राज्यात कुठे किती पाऊस?

कोकण व गोवा: डाराणू ८.३. सावंतवाडी ७.८. संगमेश्वर देवरुख ६.८. लांजा ५.९. तळा ५.८. पाली. कणकवली ५.६ प्रत्येकी, मंडणगड ४.४. रोहा ३.९. वैभववाडी ३.८. दोडामार्ग ३.६. चिपळूण ३.४. वाल्पोर्ड ३.३. सावरडे ३.३. पोलादपुर २.९. मुल्डे मोखेडे २.९. केपे २.८, राजापूर २.५, रत्नागिरी २.३. माणगाव महाड २.१ प्रत्येकी ठाणे १.८., काणकोण १.७. तलासरी, विक्रमगड, पेडणे १.६. प्रत्येकी अंबरनाथ १.५. खालापूर, मुरुड मुरचाड १.४ प्रत्येकी माथेरान खेड कुडाळ १.२ प्रत्येकी, महापसा १.०.

मराठवाडा: वाशी ०.७. धाराशिव ०.६, लोहारा ०.४, काजी, वैजापूर, नीलगा, हिंगोली ०.३ प्रत्येकी हिंगोली ०.२.

मध्य महाराष्ट्रः राधानगरी ११.६. शाहूवाडी ८.२, महाबळेश्वर ७.३. आजरा ६.८, वेल्हे ६.३. कोकुर्ड ६.३, चांदगड, पेठ, कागल ४.६ प्रत्येकी, गारगोटी भुदरगड ४.३. हसूल ४.१. पौड २.६, इगतपुरी, ओझरखेडा २.५, कोल्हापूर २.४. शिराळा २.३. वणी १.९. सुरगाणा १.७. नाशिक दिंडोरी १.३, चांदवड १.२, वडगाव १.०, गडहिंग्लज ०.९. सातारा पाटण ०.८, वाई ०.७. मेढा पन्हाळा ०.६. देवळा राजगुरुनगर शिरूर ०.५ प्रत्येकी, सिन्नर वाळवा, इस्लामपुर, कराड ०.४ प्रत्येकी

विदर्भ: भामरागड १.७, कोपर्न ०.५, जिवती, बल्लारपूर मूल ०.४ प्रत्येकी, अहिरी ०.३. लाखनी गोंदिया, नांदुरा ०.२ प्रत्येकी, लाखांदूर साकोली, सिंदखेडराजा, गडचिरोली, नरखेडा अकोले, चामोर्शी, वरुड नागभीर ०.१ प्रत्येकी.

घाटमाथाः शिरगाव १५.०, दावडी ११.४. ताम्हिणी ११.२. कोयना (नवजा) ९.८. डुंगरवाडी ९.६, अंबोने ७.२. मिरा ६.८. कोयना (पोफळी) ५.३. लोणावळा (टाटा) ३.६, वळवण ३.०, लोणावळा (ऑफिस), वाणगाय, शिरोटा २.४ प्रत्येकी ठाकुरवाडी २.२, खोपोली १.५. बंद ०.५.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+