Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Rain : पुढचे 48 तास महत्वाचे! दक्ष राहा..7 दिवसही पावसाचेच! आज पाऊस कुठे पडणार? वाचा

Maharashtra Rain : राज्यात सध्या पावसाचे दिवस असून जुलै महिन्यात हंगामातील सर्वात जास्त पाऊस पडतो. दोन तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन झाले नसून पावसाने आपला वेग वाढवला आहे. महिनाअखेर हीच स्थिती असणार आहे.महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता असून यादरम्यान काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटही होणार आहे तर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुढील 48 तास पावसाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.

Maharashtra Rain

कोकणात आज कसा असेल पाऊस?

आज 27 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच किनारपट्टीलगत सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मध्य महाराष्ट्रात आज कसा असेल पाऊस?

मध्य महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या भागात सध्या हवामान ढगाळ आहे.

मराठवाड्यात पावसाची शक्यता काय?

राठवाड्यात आज सर्वत्र हवामान ढगाळ आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात काही ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होणार नाही.

विदर्भात पावसाची स्थिती कशी?

विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेंना व्यक्त केली आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात पाऊस कसा असेल?

पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागात आज खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यामध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहुन पावसाची हीच स्थिती असेल आणि घाट विभागाचाही पाऊस जोरदार पडू शकतो. दरम्यान एक ऑगस्टपर्यंत पुण्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि घाट विभागातही जोरदार पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात 28 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान कसे राहील हवामान?

महाराष्ट्रात 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात कोकण, मध्य महाराष्,ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती राहील.

28 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 28 जुलैला विदर्भ आणि मराठवाडा पावसाचा जोर कमी राहील.

29 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात मात्र काही ठिकाणीच पाऊस पडेल.

30 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असून मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

31 जुलै - कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.

1 ऑगस्ट - कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. या दरम्यान काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशा अंदाज पुणे व्यक्त केला आहे.

नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले

नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरूच असल्याने रविवारी सकाळी प्रकल्पाचा चौथा दरवाजा उघडण्यात आला आहे. गोदावरी नदी पात्रात 1668 क्युमेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत आहे. नांदेड महापालिकेने खबरदारीच्या उपायोजना म्हणून नांदेड शहर परिसरात गोदावरी नदीकाठी जीवरक्षक दल तैनात केले आहे. दरम्यान शनिवारी रात्री पावसाने विश्रांती घेतली आहे.

नदीकाठच्या लोकांना इशारा

उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरु असलेल्या विसर्गा मध्ये वाढ करून आज दिनांक- 26.07.2025 रोजी रात्री 11:00 वाजता 25000 क्यूसेक्स एवढा करण्यात येणार आहे. सदर विसर्गा मध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असं आवाहन उजनी व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा पो मोरे यांनी केले आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+