राज्यात आज अन् उद्या पावसाचा जोर! कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील मराठवाडा हवामान अंदाज जाणून घ्या
Maharashtra Rain pavsacha andaj : महाराष्ट्रात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यादरम्यान कोकणा जोरदार पावसाची शक्यता असून पाठोपाठ मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटांसह पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
आज 21 जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहेच, पण उद्याही 22 जुलै रोजी पावसाची शक्यता आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. घाट विभागात जोरदार पाऊस तर कोकणात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आज आपण महाराष्ट्रातील विभागनिहाय हवामान अंदाज जाणून घेऊया.

कोकण
कोकणामध्ये आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उद्या 22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी कोकणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यादरम्यान किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची कोकणात शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रामध्ये 21 जुलै रोजी म्हणजेच आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. 22 जुलै रोजी म्हणजेच उद्या काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात 21 जुलै रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 22 जुलै रोजी मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ
विदर्भात 21 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे , तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो असं पुणे वेधशाळेने म्हटलं आहे. 22 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांचा कडकडाटही काही ठिकाणी होण्याची शक्यता विदर्भात पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
पुणे आसपासचा परिसर
पुण्यात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता तसेच अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच घाट विभागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता या काळात आहे.












Click it and Unblock the Notifications