Maharashtra Rain : पुण्याला ऑरेंज अलर्ट! आगामी 4 दिवस पावसाचे; जाणून घ्या जिल्हानिहाय हवामान अंदाज
Maharashtra Rain : राज्यात पावसाची लय येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार आहे. कोकण गोव्यात पुढे तीन-चार दिवस काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज काही ठिकाणी तर पुढील दोन-तीन दिवस तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
यासह विदर्भात पुढील तीन-चार दिवस तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार-पाच दिवस कमाल व किमान तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही, असा अंदाजहा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात येत्या चार दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यताआहे.

हवामान अंदाज - राज्यात कोठे कसा पाऊस पडणार
पुणे, कोल्हापूर - ऑरेंज अलर्ट
राज्यातील पुणे कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांच्या घाट विभागांमध्ये पुढील तीन-चार दिवस एक दोन ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण-गोवा - येलो अलर्ट
राज्यातील कोकण गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ- सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढे चार-पाच दिवस मेघगर्जना विधानसभा कडकडे व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग 27 ते 30 जूनदरम्यान मुसळधार पाऊस होणार
रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये 27 ते 30 जून दरम्यान एक दोन ठिकाणी मुसळधार ती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात कसे राहील हवामान?
पुढील दोन-तीन दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यतः राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुणे घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून कुठे पोहचला..?
मान्सूनची देशातील वाटचाल अपेक्षेप्रमाणे सुरु आहे. पुढील 24 तासात राजस्थान पंजाब, हरियाणाच्या आणखी काही भागात दिल्ली तसेच पश्चिम उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागात नैऋत्य मान्सूनचा पाऊस पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications