मुंबई पुण्याला ऑरेंज अलर्ट! कोकणात मुसळधार पाऊस बरसणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती
Maharashtra Rain Orange Alert in Mumbai Pune : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात स्थिर स्थावर झाला असून पंधरा जूनपासून पावसाने आपला मुक्काम महाराष्ट्रात ठोकला आहे. अशातच आज मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबई आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर दुसरीकडे कोकणातील रायगड, पालघर, सिंधूदुर्ग या जिल्ह्यात आज २१ आणि उद्या २२ जूनला अतिवृ्ष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणीही आज पावासाचे आगमन आझ होणार आहे. येत्या दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भात तुलनेत पाऊस कमी पडणार असून तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आगामी २६ जूनपर्यंत पावसाची स्थिती कशी राहील?
- राज्यातील कोकण भागात आजपासून २६ जूनपर्यंत बहुतांशिकाणी पावसाची शक्यता आहे.
- मध्य महाराष्ट्रात येत्या२६ जूनपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
- मराठवाड्यात याच काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
- तर विदर्भात २३ जूनपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून २४ जूनला काही ठिकाणी तर २५ आणि २६ जूनला बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
गेल्या २४ तासांतील पाऊस
कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते काही ठिकाणी जोरदारः मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडला. कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणीः मध्य महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी: मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.
गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमीमध्ये)
कोंकण व गोवाः मोखेडा १५.३. जव्हार १५.१, पोलादपूर १४.९, मंडणगड १३, खेड ११, वाडा १०.१, पाली ९.७, रोहा ९.५, दापोली ९.१, याकयळी ९, मुरबाड ८.९, महाड ८.८, म्हसळा ८.८, खालापूर ८.३. माणगाव ७.९, श्रीवर्धन ७.५. सावर्डे ७.५. ७.३, तलासरी ७.२, विक्रमगड ७.२, लांजा ६.६, कणकवली ६.४, हर्ण ६.१, तळा ५.६, कर्जत ४.५, वसई ४.४. देवगड ४.४, भिवंडी ४.१, ठाणे ४.१, गुहागर ४. माथेरान ३.८, पेण ३.६, डहाणू ३.६, चिपळूण ३.४, अंबरनाथ 3.3. पवारवाडी ३.३.. सांताक्रुझ ३.२. ठाणे ३. सावंतवाडी ३. उल्हासनगर २.९, आवळेगाव २.९, कल्याण २.६. २.५. वैभववाडी २.४. उरण २.१, राजापूर २. पालघर १.९. कुडाळ १.८, मुरुड १.४. पनवेल १.
मध्य महाराष्ट्रः महाबळेश्वर २१.२. हसूल २१.१. लोणावळा १७.२. इंगतपुरी १३.५. ओझरखेडा १२.२. वडगाव ११, वेल्हे १०.८. त्रयंबकेश्वर १०.७, राधानगरी ९.७, आजरा ७.६, पौड ६.८, आंबेगाव घोडेगाव ६.५, नासिक ६.१, राजगुरुनगर ५.७. सिन्नर ५. पेठ ४.६. बाई ४.३. भोर ४.२. तळेगाव ४.२. चांदगड ३.९, फलटण ३.८. एनडीए पुणे (शहर) ३.५. शाहूवाडी ३.५, चिंचवड ३.३. चांदवड ३.२, कोकरूड ३.२, खंडाळा ३.२. सातारा २.९, वणी २.९, जुन्नर २.९, शिरपूर २.८, मेवा २.४. पन्हाळा २.४. संगमनेर २.३. अकोले २.१. अक्कलकुवा २. नंदुरबार १.८. श्रीगोंदा १.७. सुरगाणा १.५. पाटण १.४. कोपरगाव १.४. तळोदा १.१, कडेगाव १.१. नवापूर १.
मराठवाडाः खुलताबाद २.३. तोंडापूर १.७. वैजापूर १.६. गंगापूर १.३. हिमायतनगर १.३. जाफराबाद ०.९.
विदर्भ: खरांधा ४.७. येवतमाळ ३.१. आंबेगाव २.३. बाबुलगाव १.४. कोरपना १.१. अमरावती १, सालेकसा ०.८. मौदा ०.६.
घाटमाथाः ताम्हिणी ३७.०, शिरगाव ३६.०, दावडी २५.०, लोणावळा (टाटा) २०.५, डुंगरवाडी २०.०, लोणावळा (ऑफिस) १९.३. अंबोने १८.४. कोयना (नवजा), वळवण १५.८. मिरा १५.२, शिरोटा १०.६, बंद १०.१, खोपोली ८.४. भिवपुरी ८.२,
ठाकुरवाडी ६.७, याणगाव ६.२, कोयना (पोफळी) ५.२. धारावी १.७.












Click it and Unblock the Notifications