कोकणात ऑरेंज, मुंबईत येलो अलर्ट! राज्यात कोठे कसा पाऊस पडणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांकडून
Maharashtra Rain Orange alert in Konkan Yellow alert in Mumbai : महाराष्ट्रातील कोकणात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबईत आणि मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट दिला आहे. गुजरातजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असून याचा फायदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना होत आहे.

महाराष्ट्र हवामान विभागाच्या प्रभारी शुभांगी ए भुते म्हणाल्या, "कालपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडत असल्याचे आपण पाहिले आहे. याचे कारण गुजरात प्रदेशाजवळील कमी दाबाचे क्षेत्र असलेले चक्रीवादळ आहे. याचा महाराष्ट्रात चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रात कोठे कसे हवामान राहील याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला, ते आपण जाणून घेऊया.
#WATCH | मुंबई: महाराष्ट्र IMD प्रभारी शुभांगी ए भूते ने कहा, "हमने देखा है कि कल से महाराष्ट्र के कई हिस्सों में बारिश हो रही है, इसका कारण एक चक्रवाती परिसंचरण है जो गुजरात क्षेत्र के पास एक कम दबाव का क्षेत्र है, इसके कारण कोंकण के उत्तरी क्षेत्र में अच्छी बारिश होगी, ठाणे,… pic.twitter.com/vDa7mA5Szd
— ANI_HindiNews (@AHindinews) June 18, 2025
कुठे कसा पडणार पाऊस...
- अंदाजानुसार, या हवामानातील बदलामुळे कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरीच्या उत्तरेकडील भागात चांगला पाऊस पडेल.
- मुंबईतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- संपूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर घाट भागात पाऊस पडेल आणि मैदानी भागात कमी पाऊस पडेल.
- कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट, मुंबईसाठी यलो अलर्ट आणि मध्य महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील कोकणात खूपच चांगला पाऊस पडत आहे. गुजरात जवळ कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर कोकणात चांगला पाऊस पडत आहे. ठाणे आणि रायगड येथे मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आयसोलेटेड जागांवर जोरदार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो तर मराठवाड्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे असे शुभांगी भुते म्हणाल्या. कोकण, मुंबई आणि मध्य महाराष्ट्र वगळता राज्यात इतरत्र सामान्य पावसाची शक्यताही त्यांनी एनआयशी बोलताना सांगितले.
मान्सूनचा पाऊस बिहार, प. बंगालपर्यंत पोहचला
नैऋत्य मोसमी पाऊस अरबी सागराच्या आणखी काही भागातः गुजरात राज्य व विदर्भच्या उर्वरित भागात; मध्य प्रदेशच्या आणखी काही भागातः छत्तीसगडच्या बहुतांश भागातः ओडीशाच्या उर्वरित भागातः झारखंडच्या आणखी काही भागात; गांगेय पश्चिम बंगालच्या संपूर्ण भागात; उप हिमालयी पश्चिम बंगालच्या उर्वरित भागातः बिहारच्या काही भागांमध्ये दाखल झाला आहे.
- गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी खूप जोरदार व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
- कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
- कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
- विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
- राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ३७.६ अं. से. नोंदवले गेले.
गेल्या २४ तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसनुसार)
मुंबई (कुलाबा) २८.२, सांताक्रूझ २८.३, अलिबाग, रत्नागिरी ३०.३, पणजी (गोवा) ३१.६, डहाणू २८.१, पुणे २६.२, लोहगाव २७.७, अहिल्यानगर, जळगाव ३५.०, कोल्हापूर २५.७, महाबळेश्वर १९.४. मालेगाव ३०.४. नाशिक २६.८. सांगली २७.६, सातारा २६.२. सोलापूर ३०.९, धाराशिव ३०.२, छत्रपती संभाजीनगर ३०.०. परभणी ३३.६, नांदेड ३४.४, बीड ३२.९, अकोला ३४.९, अमरावती ३४.६, बुलढाणा ३९.७, ब्रह्मपुरी ३७.६, चंद्रपूर ३५.८, गोंदिया ३५.४. नागपूर ३७.४, वाशिम ३५.०, वर्धा ३७.०, यवतमाळ ३५.६ अंश सेल्सियस इतके तापमान होते.












Click it and Unblock the Notifications