मुंबई-पुण्यासह 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार! जाणून घ्या तुमच्या शहरात कसा असेल आज पाऊस अन् हवामान
Maharashtra Rain Mumbai-Pune : उत्तर छत्तीसगड व लगतच्या पूर्व मध्य प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र असून कोकण व गोव्यात पुढील चार ते पाच दिवस बहुतांश भागात तर राज्याच्या उर्वरित भागात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यासाठी हे दोन दिवस खूपच महत्वाचे आहेत, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह जवळपास सोळा जिल्ह्यात (घाट विभागासह) जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
आज पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागामध्ये जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नंदुरबार धुळे व नाशिक जिल्ह्यात धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी वारा वाहण्याची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Thunderstorms accompanied with lightning, heavy rainfall and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada .
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 4, 2025
या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार
पुढील दोन दिवस मुंबई, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, जळगाव कोल्हापूर व सातारा जिल्ह्याचा घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना येथे तसेच धुळे, नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेडसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात कसे राहील हवामान?
राज्याच्या उर्वरित भागात पुढील काही दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हा मान्सूनचा शेवटचा काळ असल्याने चांगला पाऊस या महिन्यात अपेक्षित आहे. यंदाचा मान्सून आणि पावसाळा समाधानकारक पावसाचा आहे.
पुणे अन् परिसरात कसे राहील हवामान?
पुणे व परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पुणे वेधशाळेकडून या भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहेत.
राज्यात पावसाची स्थिती असून वादळी वारा तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पावसापासून आपला बचाव करावा आणि शेतकऱ्यांनी शेतात कामं करताना काळजी घ्यावी असे हवामान विभागाकडून सुचना वेळोवेळी दिली जाते, या धर्तीवर नागरिकांनी दक्षता बाळगणे अपेक्षित आहे.












Click it and Unblock the Notifications