Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

5 जूनपर्यंत मान्सूनचा जोर कमी राहणार! आज-उद्या विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडणार, इतरत्र स्थिती तपासा

Maharashtra Rain : महाराष्ट्रात २४ आणि २५ मे रोजी हजेरी लावणाऱ्या मान्सूनने काहीसा कहर केला पण आता मान्सूनचा जोर येत्या पाच जूनपर्यंत ओसरणार आहे. गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाची सरमिसळ झाली अन् धो-धो बरसला होता. आज ३१ मे आणि उद्या १ जून रोजी विदर्भ वगळता इतरत्र पाऊस कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात सोसाट्याचा वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे; तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे.

Maharashtra Rain Monsoon

कोकण

कोकणातील रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि मुंबईत पाऊस थोडी उसंत घेणार असून येथे तुरळक ठिकाणी पाच जूनपर्यंत पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र

मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे येथे आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर येत्या पाच जूनपर्यंत हीच स्थिती राहणार आहे.

मराठवाडा

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशीव, जालना येथे आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर येत्या पाच जूनपर्यंत हीच स्थिती राहणार आहे.

विदर्भ

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि इतर बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, यादरम्यान सोसाट्याचा वारा वाहील आणि मेघगर्जना विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे. ही स्थिती तीन जूनपर्यंत राहील, त्यानंतर चार आणि पाच जूनला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान

  • कोंकण गोवा व मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी जोरदार पडला.
  • कोंकण गोवा, ठिकाणीः मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणीः मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
  • कोंकण गोव्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
  • राज्यात गेल्या चोवीस तासात सर्वात कमाल तापमान जळगाव येथे ३९.२ अंश सेल्सियस एवढे नोंदवले गेले.

गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) ३२.४, सांताक्रूझ ३३.२. अलिबाग ३२.६, रत्नागिरी ३१.६, पणजी (गोवा) २७.४. डहाणू ३३.४. पुणे ३२.०, लोहगाव ३४.१. अहिल्यानगर ३२.८. जळगाव ३९.२, कोल्हापूर २७.५. महाबळेश्वर २२.०, मालेगाव ३३.८, नाशिक ३१.३. सांगली २८.३, सातारा ३०.६, सोलापूर ३२.१, धाराशिव २९.१. छत्रपती संभाजीनगर ३३.४. परभणी ३४.२, नांदेड, बीड ३२.७. अकोला ३५.४. अमरावती ३५.८. बुलढाणा ३३.३. ब्रह्मपुरी ३८.०. चंद्रपूर ३७.८, गोंदिया ३५.४. नागपूर वाशिम ३३.४. वर्धा ३६.०, यवतमाळ ३५.४.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+