पुढील चार दिवस महत्वाचे! या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता! जाणून घ्या तुमच्या भागातील हवामान अंदाज
Maharashtra Rain Light to moderate rain likely today : महाराष्ट्रातील कोकणात आणि गोव्यात पुढील दोन दिवस बऱ्याच ठिकाणी विदर्भभात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहून पावसाचे दिवस असतील असा अंदाज आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळपासूनच जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस, ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate spell of rain , gusty winds with speed reaching 30 -40 Kmph very likely to occur at isolated places in the districts of South Konkan, North Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 5, 2025
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात कसा असेल पाऊस
मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, या जिल्ह्यांना येलो अलर्ट त्यामुळे देण्यात आलेला आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील चार ते पाच दिवस नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तर आज सांगली, परभणी, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उर्वरित महाराष्ट्रातील पावसाची स्थिती काय?
पुढील दोन दिवस राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. पुणे व लगतच्या परिसरात पुढील काही दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
एकंदरीतच आज राज्यात कसे राहील हवामान?
- आज ६ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्ता आहे, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
- मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
- विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
गेल्या चार पाच दिवसापासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा मंगळवारी दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात पडलेल्या पावसाची २१.८ मिमी नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन तीन दिवसापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाचा पारा आणि हवेतील उकाडाही वाढला होता. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक तालुक्यातील खरीपाची पिके जोमात होती. मात्र काही ठिकाणी पावसाची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. अशा भागात मंगळवारी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेवटच्या घटका मोजत असलेल्या खरीपातील तूर, मूग, सोयाबीन, सर्यफुल, उडीद या पिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.












Click it and Unblock the Notifications