Maharashtra rain : महाराष्ट्रात आज उद्या पावसाच्या सरी कोसळणार कोणत्या भागात होणार जोरदार पाऊस? वाचा
Maharashtra rain updte : एकीकडे मान्सून पंधरा जूननंतर पुन्हा जोम धरणार आहे अशी माहिती राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणावेळी दिली. त्यादरम्यान राज्यातील काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यानुसार, आज 11 जून आणि उद्या 12 जून 2025 रोजी पाऊस पडणार आहे. यादरम्यान राज्यातील कमाल तापमानातही घट जाणवत आहे.
आज राज्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत मराठवाडाण आणि विदर्भातील गोंदीया, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, भंडारा, यवतमाळ आणि गडचिरोली तसंच चंद्रपुरात विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तवली आहे.

कुठे कधी पडेल पाऊस
कोकण
आज कोकणात काही ठिकाणी पाऊस पडेल तसेच तुरळक ठिकाणी विजांसह कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उद्या कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी विजांसह कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र
आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. उद्या काही ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक उद्या मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो.
मराठवाडा
आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो. उद्या मराठवाड्यात
आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो.
विदर्भ
आज विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो. उद्याही आज विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजा आणि वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो.
ठळक घडामोडी
नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सौमा १० जून रोजीपर्यंत कायम होती. समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किमी उंचीवर उत्तर तमिळनाडू ते दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टी दरम्यान असलेली द्रोणिका रेषा आज भारतीय प्रदेशाच्या १५ अंश उत्तर अक्षांशावर शिअर झोन स्वरुपात दिसत होत्या.
गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान
- मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
- मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
- विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
- कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणीः मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बर्याच ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
- राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान नागपूर येथे ४४.२ अंश सेल्सियसमध्ये नोंदवले गेले.
गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३२.४, सांताक्रूझ ३३.५. अलिबाग ३२.२. रत्नागिरी ३०.८, पणजी (गोवा) ३०.६. डहाणू ३४.३, पुणे ३१.४. लोहगाव ३३.५, अहिल्यानगर ३४.०, जळगाव ४०.२, कोल्हापूर ३०.६, महाबळेश्वर २२.७, मालेगाव ३८.२, नाशिक ३१.३. सांगली ३०.८, सातारा ३१.६, सोलापूर ३३.३. धाराशिव छत्रपती संभाजीनगर ३७.४, परभणी ३६.९, नांदेड ३७.६, बीड ३७.९, अकोला ४१.५, अमरावती ४२.०, बुलढाणा ३६.७. ब्रह्मपुरी ४३.२. चंद्रपूर ४१.०, गोंदिया ४२.२, नागपूर ४४.२, वाशिम ३८.४, वर्धा ४३.५, यवतमाळ ४१.४.












Click it and Unblock the Notifications