हवा गुणवत्ता निरीक्षणासाठी 7 व्हॅन खरेदी;प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण
Siddhesh Kadam : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सतत फिरणाऱ्या हवा गुणवत्ता निरीक्षण वाहन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात ज्या ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे, अशा ठिकाणी ही वाहने जाऊन हवेची गुणवत्ता तपासू शकणार आहेत, असे प्रतिपादन प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर आमदार सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून सातत्याने मंडळात विविध उपक्रम राबवविले जात आहेत. विशेष करून प्रदूषणमुक्त महाराष्ट्र कसा होईल, यादृष्टीने सातत्याने लक्ष केंद्रीत केले जात आहेत. विविध कंपन्यांच्या परिसरात व विविध शहरांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कदम यांचा पुढाकार अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रदूषण मंडळाची वाटचाल ही वाखडण्याजोगी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू व त्यांनी दिलेल्या मंडळाच्या जबाबदारीला सातत्याने न्याय देण्याचे काम हे आमदार सिद्धेश कदम करत आहेत.

विशेष बाब म्हणजे आमदार सिद्धेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने 7 सतत फिरणाऱ्या 'वातावरणीय हवा गुणवत्ता निरीक्षण वाहन' खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या वाहनांच्या लोकार्पण प्रसंगाच्या कार्यक्रमात आमदार सिद्धेश कदम म्हणाले की, ज्या भागात हवेची तपासणी करण्यासाठी पूर्वी नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे हि वाहने तत्काळ पोहोचून हवेची गुणवत्ता तपासू शकतील.
नागरिकांकडून हवेच्या गुणवत्तेत घट होण्याच्या तक्रारी मिळाल्यावर या व्हॅन त्वरीत घटनास्थळी जाऊन प्रभावी तपासणी करण्यात मदत करण्यात महत्त्वाचा भाग ठरणार आहेत. खरेदी करण्यात आलेल्या वाहनांमध्ये 5 व्हॅन परर्टीकुलर मॅटर तपासण्यासाठी तर दोन व्हॅन ग्राऊंड-लेव्हल ओझोन (O3) तपासण्यासाठी आहेत. विशेषत: हिवाळ्याच्या तोंडावर या वाहन खरेदीचा अधिक उपयोग होणार आहे. यामुळे हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमची क्षमता वाढेल आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करता येईल, अशा विश्वास देखील आमदार तथा मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केला.
'इको बाप्पा'ॲपमुळे झाला मोठा फायदा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विविध जनजागृती उपक्रम देखील यावर्षी साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी इको बाप्पा हे मोबाईल ॲप विकसित केले होते. या उपक्रमामुळे यंदाच्या गणेशोत्सवात त्याचा फायदा झाला आहे. पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना खरेदी करणे सहज शक्य झाले. 'इको बाप्पा' हा ॲपमुळे गणेशभक्तांना देखील फायदा झाला. या उपक्रमासाठी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले होते. यावेळी शिंदे यांनी आमदार सिद्धेश कदम यांचे कौतुक केले होते.
पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला गेला
मंडळाने या वर्षीच्या पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी शहाणपण देगा देवा या संकल्पनेतून रेडिओ जिंगल्स्, व्हिडिओज् तयार केले असून एक लहान बालक पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला. या उपक्रमाला आमदार सिद्धेश कदम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.
नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषणासाठी पुढाकार
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईच्या नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी द ओशन क्लीनअप आणि भारत क्लीन रिव्हर्स फाउंडेशन (BCRF) सोबत सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीत संशोधन, प्लास्टिक कचरा नदीत येण्यापासून रोखणे आणि शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या करारासाठी प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी BCRF चे विश्वस्त आमदार मा. श्री. सत्यजित तांबे, BCRF चे अध्यक्ष श्री. शैलेश हरिभक्ती, तसेच बीसीआरएफचे उपाध्यक्ष आणि सेलिंगमधील अर्जुन पुरस्कारप्राप्त मा. श्री.आशिम मोंगिया यांची उपस्थिती होती. नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात हे एक ठोस पाऊल आहे. प्रदूषणाविरोधातील आपल्या मोहिमेत पुढे जाण्यासाठी प्रत्येकाच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश म्हणजे नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषण कमी करणे आणि एक स्वच्छ, निरोगी पर्यावरण निर्माण करणे असल्याचे प्रतिपादन आ. सिद्धेश कदम यांनी केले होते.
मंडळाची धुरा हाती घेता कदमांचा राज्याला संदेश
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर आमदार सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला होता. त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की, जे अनेक पर्यावरणीय मोहिमेतून आपल्या परिसराचे रहाणीमान उत्तम ठेवण्यासाठी , अनुपालनाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी सतत झटत असते त्या मंडळाच्या नियामक आकांक्षा आपल्या समोर प्रदर्शीत करताना मला अत्यंत आनंद होतो. प्रदूषण मंडळाचे काम लोकांपर्यंत पोहोचावे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचा फायदा व्हावा त्यासाठी आम्ही सातत्याने झटत राहणार आहोत. मंडळाचा ई-कॅटलिस्ट उपक्रम प्रत्येकाला जागतिक पर्यावरणाच्या आधुनिक माहिती बद्दल व मंडळाच्या आधुनिक घडामोडींबद्दल सातत्याने अद्ययावत ठेवेल. सर्वांना पर्यावरणाच्या मैत्रपूर्ण उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा.












Click it and Unblock the Notifications