Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'OBC आरक्षण संकटात' म्हणत भुजबळ समर्थक तथा ओबीसी नेत्याची आत्महत्या; 'हा' जिल्हा हादरला!

OBC Reservation Crisis : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरून महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यात आरक्षणाच्या प्रश्नावर पहिली आत्महत्या झाल्याची माहिती मिळत आहे.

विजय बोचरे (वय 59) नावाच्या ओबीसी नेत्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. विशेष म्हणजे, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

OBC Reservation Crisis

आरक्षणाला धक्का आणि असुरक्षिततेची भावना

विजय बोचरे यांनी पातुर तालुक्यातील आलेगाव येथील बसस्थानकाच्या प्रवासी निवाऱ्यात आज (9 ऑक्टोबरच्या) पहाटे गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेले पत्र आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर ठेवले होते. या पत्रातून त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात हैद्राबाद गॅझेटियरनुसार काढलेला अध्यादेश हा मूळ ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारा आहे. या अध्यादेशामुळे मूळ ओबीसींचे आरक्षण संपल्यात जमा झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडले असून, त्यांना मूळ प्रवाहात न येऊ देण्याचे हे सरकारी धोरण असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

'आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही'

आत्महत्येपूर्वी विजय बोचरे यांनी लिहिलेल्या पत्रात आणि व्हाट्सअप स्टेटसमध्ये ओबीसींच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित नसल्याची तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे, त्यामुळे "आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही."

पहाटे अडीचच्या सुमारास ठेवलेल्या भावनिक स्टेटसमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांना उद्देशून स्पष्ट आवाहन केले होते.

  • "ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये."
  • "जातीय जनगणना झाली पाहिजे."
  • "जय ओबीसी, जय संविधान."
  • ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि जातीय जनगणना व्हावी, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.

पोलिसांकडून तपास सुरू

विजय बोचरे यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, ओबीसी समाजात संतापाची लाट पसरण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस तत्काळ आलेगाव येथे दाखल झाले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. चान्नी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेली ही पहिली आत्महत्या असून, या घटनेमुळे राज्य सरकारवर या संवेदनशील विषयावर तातडीने तोडगा काढण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+