Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देवेंद्र फडणवीस आज राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार

Maharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर आज महायुतीचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता होणार मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 60,000 लोकांच्या संभाव्य गर्दीला सामावून घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी एलईडी स्क्रीन आणि साउंड सिस्टीम बसवण्यात आली आहे.

devendra fadnavis

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासह २२ राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांसारखे राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बहूमतांसाठी 145 आमदार आवश्यक

महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला किमान 145 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे 132 जागा आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 57 जागा आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 41 आमदार विजयी झाले आहे. यासोबतच काही अपक्ष महायुतीच्या बाजूने आहेत.

प्रसिद्ध गायक कैलाश खेर आणि प्रसिद्ध कलाकार अजय-अतुल या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याचे वृत्त आहे. प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी आणि मराठी आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.

संत-महंतांना निमंत्रण

महायुतीच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रासह देशभरातील 100 हून अधिक संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या शपथविधी सोहळ्याला संत-मंहत उपस्थित राहून राज्याला नवीन उंचीवर नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देतील. शिवसेना प्रमुख व पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार ही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+