MNS Candidates List : मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; माहिममधून अमित ठाकरे मैदानात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 45 उमेदवारांचा समावेश आहे.
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांच्या वतीने ही यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये कल्याण ग्रामीममधून प्रमोद (राजू) पाटील, माहिममधून अमित राज ठाकरे यांच्यासह 45 जणांचा समावेश आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे ठाकरे कुटुंबात आतापर्यंत आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या मैदानात उडी मारली होती. तर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मतदारसंघ अन्य उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे...!

मनसेची पहिली यादी
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याआधी बाळा नांदगावकर (शिवडी, मुंबई), दिलीप धोत्रे (पंढरपूर), संतोष नागरगोजे (लातूर ग्रामीण), बंडू कुटे (हिंगोली विधानसभा), मनदीप रोडे (चंद्रपूर), सचिन भोयर (राजुरा), राजू उंबरकर (यवतमाळ) हे उमेदवार घोषित केले होते.
राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतील बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. काही उमदेवारांसाठी त्यांनी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी आता विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.
राज ठाकरे महायुती, महाविकास आघाडी तसेच इतर कोणत्याही पक्षाला देणार नसल्याचे राज ठाकरे यांनी मागेच जाहीर केले. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यंदाच्या विधानसभेला महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती या तीन मोठ्या आघाड्या असून इतर काही पक्ष एकटे लढत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी खालीलप्रमाणे.... pic.twitter.com/te6UvdlJoo
— Raj Thackeray (@RajThackeray) October 22, 2024
मनसेची दुसरी यादी
कल्याण ग्रामीण- प्रमोद (राजू) पाटील,
माहिम- अमित राज ठाकरे
भांडूप पश्चिम - शिरीश सावंत
वरळी- संदीप देशपांडे
ठाणे शहर - अविनाश जाधव
मुरबाड - संगीता चेंदवणकर
कोथरुड - किशोर शिंदे
हडपसर- साईनाथ बाबर
खडकवासला - मयुरेश रमेश वांजळे
मागठाणे - नयन कदम
बोरिवली - कुणाल माईनकर
दहिसर - राजेश येरुणकर
दिंडोशी - भास्कर परब
वर्सोवा - संदेश देसाई
कांदिवली पूर्व - महेश फरकासे
गोरेगाव - विरेंद्र जाधव
चारकोप - दिनेश सावळी
जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
विक्रोळी - विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे












Click it and Unblock the Notifications