राज्यात 'एवढ्या' नगराध्यक्षासह भाजप नंबर वन! कोणत्या विभागात कुणाचे किती नगरसेवक अन् नगराध्यक्ष वाचा
Maharashtra nagar parishad election result 2025 division wise winners list : राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवला आहे. एकूण निकालांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक जागांवर महायुतीचा झेंडा फडकला असून, एकट्या भारतीय जनता पक्षाने १२९ नगराध्यक्ष आणि ३३२५ हून अधिक नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाचे वर्णन 'टीम भाजपचा विजय' असे केले असून, विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिलेली ही मोठी कौल असल्याची भावना व्यक्त केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विदर्भात भाजपने ५८ नगराध्यक्ष निवडून आणत आपला बालेकिल्ला राखला, तर पश्चिम महाराष्ट्रात १९ नगराध्यक्षांसह भाजपने मुसंडी मारली. कोकणात शिवसेना (शिंदे गट) १० नगराध्यक्षांसह आघाडीवर राहिली. महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा फटका बसला असून ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस मिळून ५० चा आकडाही गाठू शकले नाहीत.
महाराष्ट्र नगरपरिषद निवडणूक २०२५ - विभागवार निकाल
१. विदर्भ (एकूण १०० जागा)
- भाजप: ५८
- काँग्रेस: २३
- शिवसेना (शिंदे): ०८
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०७
- इतर: ०४
- ठाकरे गट: ००
- शरद पवार गट: ००
२. पश्चिम महाराष्ट्र (एकूण ६० जागा)
- भाजप: १९
- शिवसेना (शिंदे): १४
- राष्ट्रवादी (अजित पवार): १४
- इतर: ०६
- राष्ट्रवादी (शरद पवार): ०३
- काँग्रेस: ०३
- शिवसेना (ठाकरे): ०१
३. मराठवाडा (एकूण ५२ जागा)
- भाजप: २५
- शिवसेना (शिंदे): ०८
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०६
- काँग्रेस: ०४
- शिवसेना (ठाकरे): ०४
- इतर: ०३
- राष्ट्रवादी (शरद पवार): ०२
४. उत्तर महाराष्ट्र (एकूण ४९ जागा)
- भाजप: १८
- शिवसेना (शिंदे): ११
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०७
- काँग्रेस: ०५
- इतर: ०५
- शिवसेना (ठाकरे): ०२
- राष्ट्रवादी (शरद पवार): ०१
५. कोकण (एकूण २७ जागा)
- शिवसेना (शिंदे): १०
- भाजप: ०९
- इतर: ०४
- शिवसेना (ठाकरे): ०२
- राष्ट्रवादी (अजित पवार): ०१
- राष्ट्रवादी (शरद पवार): ०१
- काँग्रेस: ००
६. संपूर्ण महाराष्ट्र (एकूण २८८ नगराध्यक्ष)
- भाजप: १२९
- शिवसेना (शिंदे): ५१
- राष्ट्रवादी (अजित पवार): ३५
- काँग्रेस: ३५
- इतर: २२
- शिवसेना (ठाकरे): ०९
- राष्ट्रवादी (शरद पवार): ०७
७. एकूण नगरसेवक संख्या (Corporators)
- भाजप: ३३२५
- शिवसेना (शिंदे): ६९५
- शिवसेना (ठाकरे): ३७८
- राष्ट्रवादी (अजित पवार): ३११
- राष्ट्रवादी (शरद पवार): १५३
- काँग्रेस: १३१
- इतर: १४०
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा विजय म्हणजे टीम भाजप आणि महायुतीवर जनतेने टाकलेला प्रचंड विश्वास आहे. २०१७ मध्ये आमचे १६०२ नगरसेवक होते, आज ती संख्या ३३२५ वर पोहोचली आहे. आम्ही विधानसभेसारखाच दणदणीत परफॉर्मन्स स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिला आहे. ही केवळ आगामी महापालिका निवडणुकांची नांदी आहे!"












Click it and Unblock the Notifications