राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले!, 15 ला मतदान तर 16 जानेवारीला लागेल निकाल!
राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूक होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या संदर्भातील घोषणा केली.
- उमेदवारी दाखल : 23 ते 30 डिसेंबर 2025
- उमेदवार अर्जांची छाननी : 31 डिसेंबर 2025
- उमेदवारी मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : 3 जानेवारी 2026
- मतदान : 15 जानेवारी 2026
- मतमोजणी : 16 जानेवारी 2026

आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. ही आचारसंहिता ही डिझास्टरसाठी आडकाठी राहणार नाही.
29 महापालिकांत 2869 जागा
- एकूण महानगर पालिका - २९
- एकूण जागा - २,८६९ जागांसाठी
- महिला - १, ४४२
- अनुसूचित जाती - ३४१
- अनूसूचित जमाती - ७७
- नागरिकांचा मागास प्रवर्ग - ७५९
1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाणार!
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल, असे ते म्हणाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून २०० पेक्षा अधिकारी आहेत, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकार ७०० पेक्षा जास्त अधिकारी नेमण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार कर्मचारी निश्चित करण्यात आले.
मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी प्रचाराला निर्बंध राहतील.
28 महापालिका या बहुसदस्यीय!
बृहन्मुंबई महापालिकेत 1 सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे येथील मतदारांना 1 मत द्यावे लागेल. 28 महापालिका या बहुसदस्यीय आहेत. बहुतांश महापालिकांत एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचेत. काही प्रभागात 5 व काही ठिकाणी 3 उमेदवार असतील. त्यामुळे या 28 महापालिकांत मतदारांना एका प्रभागात साधारणतः 3 ते 5 मते द्यावे लागतील, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
- एकूण मतदार - 3.48 कोटी
- एकूण मतदार केंद्र - 39,147
- मुंबईसाठी मतदार केंद्र - 10,111
- कंट्रोल यूनिट - 11,349
- बॅलेट यूनिट - 22,000
निवडणूक खर्चाची मर्यादा
महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे.
अ वर्ग - 15 लाख
ब वर्ग - 13 लाख
क वर्ग - 11 लाख
ड वर्ग - 9 लाख
BMC Election Date : दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार चिन्ह!
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल.
कोणत्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार?
1. बृहन्मुंबई - 227
2. भिवंडी-निजामपूर - 90
3. नागपूर - 151
4. पुणे - 162
5. ठाणे - 131
6. अहमदनगर - 68
7. नाशिक - 122
8. पिंपरी-चिंचवड - 128
9. औरंगाबाद - 113
10. वसई-विरार - 115
11. कल्याण-डोंबिवली - 122
12. नवी मुंबई - 111
13. अकोला - 80
14. अमरावती - 87
15. लातूर - 70
16. नांदेड-वाघाळा - 81
17. मीरा-भाईंदर - 96
18. उल्हासनगर - 78
19. चंद्रपूर - 66
20. धुळे - 74
21. जळगाव - 75
22. मालेगाव - 84
23. कोल्हापूर - 92
24. सांगली-मिरज-कुपवाड - 78
25. सोलापूर - 113
26. इचलकरंजी - 76
27. जालना - 65
28. पनवेल - 78
29. परभणी - 65












Click it and Unblock the Notifications