Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईत ठाकरे बंधू -भाजपमध्ये 'काँटे की टक्कर', दुपारी 12.30 पर्यंत कोणत्या ठिकाणी कोणाला आघाडी? वाचा

Maharashtra Municipal Election Results 2026 LIVE : आज १६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीला वेग आला असून, दुपारी १२:३० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार राज्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. मुंबईत शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असताना, पुणे, नवी मुंबई, पनवेल आणि जळगावमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व राखल्याचे दिसत आहे.

Maharashtra Municipal Election Results 2026 LIVE

१. मुंबई महानगरपालिका: ठाकरेंचे आव्हान की भाजपचे वर्चस्व?

  • मुंबईत २२७ जागांसाठी होत असलेल्या मतमोजणीत सध्या 'काँटे की टक्कर' सुरू आहे.
  • भाजप: ६३ जागांवर आघाडी (सर्वात मोठा पक्ष).
  • शिवसेना (ठाकरे गट): ५२ जागांवर आघाडी.
  • शिवसेना (शिंदे गट): २० जागांवर आघाडी.
  • काँग्रेस: ११ जागांवर आघाडी.
  • मनसे: ०७ जागांवर आघाडी.

राजकीय विश्लेषण

महायुती एकूण ८३ जागांवर पुढे आहे, तर ठाकरे आणि मनसे मिळून ५९ जागांवर आहेत. ठाकरे गटाने दावा केला आहे की, सर्व २२७ जागांचे कल हाती आल्यावर मुंबईत ठाकरेंचाच महापौर बसेल असा दावा ठाकरे गटाचे नेते करत आहेत.

२. पुणे आणि पिंपरी-चिंचवड: भाजपचे निर्विवाद वर्चस्व

  • पुणे: १६५ जागांपैकी ५० जागांचे कल हाती आले असून भाजप ५० वर आघाडीवर आहे. येथे राष्ट्रवादी (अजित पवार) ८, तर शरद पवार गट ३ जागांवर आहे. मनसे आणि ठाकरेंना अद्याप खाते उघडता आलेले नाही.
  • पिंपरी-चिंचवड: १२८ पैकी ११९ जागांचे कल आले आहेत. येथे भाजप ७० जागांसह विजयाकडे वाटचाल करत आहे, तर अजित पवार गट ४० जागांवर आहे.

३. कोकण पट्टा: नवी मुंबईत नाईकांचे वर्चस्व, पनवेलमध्ये 'कमळ'

  • नवी मुंबई: गणेश नाईक यांनी आपला बालेकिल्ला राखला असून भाजपने ६८ जागांवर आघाडी घेतली आहे. शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वादाचा नाईकांच्या वर्चस्वावर कोणताही परिणाम झालेला नाही.
  • पनवेल: ७८ पैकी ३५ जागांच्या कलानुसार भाजपने २२ जागांवर आघाडी घेत पालिकेवर आपला दावा ठोकला आहे.
  • उल्हासनगर: ७८ पैकी १२ जागांचे कल आले असून भाजप आणि शिंदे गट प्रत्येकी ६-६ जागांवर आहेत.

४. छत्रपती संभाजीनगर: भाजपची सरशी, MIM ची धास्ती

  • ११५ जागांपैकी ६६ जागांचे कल हाती आले आहेत:
  • भाजप: २१, शिंदे गट: १५, ठाकरे गट: ०६.
  • येथे इतर (प्रामुख्याने MIM) १७ जागांवर आघाडीवर असून ते किंगमेकर ठरू शकतात.

५. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली: शिंदेंचा बालेकिल्ला अभेद्य

  • ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपला गड राखला आहे. १३१ पैकी १८ जागांवर शिंदे गट, तर १० जागांवर भाजप आघाडीवर आहे.
  • कल्याण-डोंबिवली: येथे भाजप २८ जागांसह आघाडीवर आहे, तर शिंदे गट १६ जागांवर आहे. विशेष म्हणजे येथे मनसे (४ जागा) ठाकरे गटापेक्षा (२ जागा) पुढे आहे.

६. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र: भाजपची महामुसंडी

  • जळगाव: जळगाव महापालिका पूर्णपणे भाजपच्या ताब्यात जाताना दिसत आहे.
  • जालना: ६५ पैकी २४ कल आले असून भाजपने १९ जागांवर आघाडी घेतली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला येथे अद्याप खाते उघडता आलेले नाही.
  • नांदेड: ८१ पैकी ३१ कल आले असून भाजप १५ जागांवर, तर शिंदे गट ४ आणि इतर ७ जागांवर आघाडीवर आहेत.

थोडक्यात स्थिती (दुपारी १२:३० वाजेपर्यंत)

  • भाजपसाठी मोठी बातमी: नवी मुंबई, पुणे, जळगाव आणि पनवेलमध्ये स्पष्ट वर्चस्व.
  • शिंदे गटासाठी जमेची बाजू: ठाणे आणि कल्याणमध्ये आपली पकड मजबूत राखली.
  • ठाकरे गटासाठी चिंता: मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात (विशेषतः जालना, पुणे, पिंपरी-चिंचवड) पक्षाला खाते उघडण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+