Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahapalika Result Live : 29 महापालिकेत भाजप वरचढ; उद्धव-राज फेल, शिंदे-दादांची स्थिती काय?

Municipal corporation election 2026 Result Live : महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच नागपूरसह एकूण २९ महानगरपालिकेचा निकाल आज 10 वाजेपासून लागण्यास सुरुवात झाली. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दुपारपर्यंत आलेल्या निकालांच्या कलामध्ये भाजप सर्व महापालिकांमध्ये आघाडीवर आहे. तर लातूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. ठाकरेंची मुंबई अशी ओळख आता संपुष्टात आली असून या ठिकाणी भाजपाने घवघवीत यश संपादन केले. तर शिंदेंची शिवसेनेने देखील विविध महापालिकेत चांगला विजय मिळवला आहे. ठाकरे बंधू मुंबईसह राज्यातील विविध महापालिकेत नापास झाल्याचे दिसून आले आहे.

महानगरपालिकांसाठी गुरुवारी (दि. १५) जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमारे ३.४८ कोटी मतदारांनी विविध शहरातील १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केले होते. तर आज शुक्रवार (दि. १६) जानेवारी २०२६ निकाल लागण्यास सुरवात झालेली आहे. यात २९ पैकी सुमारे २० ते २५ ठिकाणच्या महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

BMC election result 2026

मतदानाची ठिकाण

एकूण २९ महानगरपालिकामध्ये (बृहन्मुंबईसह) २,८६९ जागांसाठी ८९३ प्रभागांत मतदान झालेले आहे. तर सर्व महापालिका निवडणुकीच्या निकालाचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी ही बातमी सतत रिफ्रेश करत राहा.. अन् मिळवा लेटेस्ट अपडेट ते ही प्रत्येक शहराचे.

4:38 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : निवडणुकीदरम्यान वाटलेल्या पैशांवर ईडी गप्प का? ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत

अरविंद सावंत यांनी निवडणुक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
4:36 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : जनतेने विकासाचा ब्रँड निवडला, नकारात्मकता नाकारली - एकनाथ शिंदे

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांतील दणदणीत विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील जनतेने विकासाचे राजकारण निवडले आहे. बीएमसीमध्ये भाजप-शिवसेनेने चांगली कामगिरी केली आहे. मुंबईतील जनतेने महायुतीला बहुमत दिले आहे. यासाठी मुंबईकरांचे मनापासून आभार. जनतेने भाजप आणि शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहोत. लोकांना विकास हवा आहे. जनता भावनिक राजकारणात अडकत नाही. जनतेने नकारात्मकतेचे राजकारण नाकारले आहे.
4:35 PM, 16 Jan

Municipal Corporation Result 2026 : संभाजीनगरात ठाकरे गटाचे रशीद मामू विजयी!

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार रशीद मामू यांचा विजय झाला आहे. अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर चर्चा सुरू होती. ठाकरे गटाने त्यांना प्रभाग क्रमांक 4 ब मधून उमेदवारी दिली. त्यांची लढत MIM च्या खान अमीर अनवर यांच्याशी झाली. रशीद मामूंच्या उमेदवारीला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला होता. प्रचारासाठी जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आज रशीद मामू यांनी विजय मिळवला आहे.
4:18 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : 20 हून अधिक महानगरपालिकांमध्ये भाजपची आघाडी

20 हून अधिक महानगरपालिकांमध्ये भाजपची आघाडी पाहायला मिळतेय. यामध्ये मुंबई - भाजपची आघाडी । पुणे - भाजपची आघाडी । कल्याण - डोंबिवली - शिंदे सेनेची आघाडी । ठाणे - शिंदे सेनेची आघाडी । नवी मुंबई - भाजपची आघाडी । मीरा - भाईंदर - भाजपची आघाडी । उल्हासनगर - भाजपची आघाडी । वसई-विरार - भाजपची आघाडी । भिवंडी - भाजपची आघाडी । - पिंपरी चिंचवड - भाजप आघाडी । नाशिक - भाजप आघाडी । संभाजीनगर - भाजप आघाडी । कोल्हापुर - काँग्रेस आघाडी । सांगली - मिरज - भाजप आघाडी । सोलापूर - भाजप आघाडी । मालेगाव - शिंदे सेना आघाडी । अहिल्यानगर - भाजप-राष्ट्रवादी आघाडी । जळगाव - भाजप आणि शिंदे सेना आघाडी । धुळे - भाजप आणि शिंदे सेना आघाडी । धुळे - भाजप आघाडी । इचलकरंजी - भाजप आघाडी । नांदेड - भाजप शिवसेना आघाडी । चंद्रपूरमध्ये - काँग्रेस आघाडीवर
4:07 PM, 16 Jan

मुंबईत भाजप नंबर -1; ठाकरे बंधू पराभूत का झाले, वाचा 5 मोठी कारणे

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीचे १६ जानेवारी २०२६ रोजी लागलेले निकाल हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या युगाचा अंत आणि नवीन पर्वाची सुरुवात मानले जात आहेत. गेल्या ३ दशकांपासून मुंबईवर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे कुटुंबाचा बालेकिल्ला यंदा ढासळला असून, मुंबई महापालिका आता 'महायुती'च्या (भाजप + शिंदे गट) ताब्यात गेली आहे.
                                                                       
4:06 PM, 16 Jan

"मशाल विझली अन् इंजिनचा धूरही संपला!"; ठाकरे बंधूंवर बोचरा वार

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, राजकीय मैदानात शब्दांच्या फैरी झडू लागल्या आहेत. मतमोजणीचे कल हाती येत असतानाच, शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे.
                                                                       
4:03 PM, 16 Jan

Pune Mahapalika Election Result 2026 : पुणेकर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला – मुरलीधर मोहोळ

काम न करणारे बोलत राहिले, पुणेकर जनतेने मात्र आमच्यावरती विश्वास दाखवला. आम्हाला पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल पुणेकरांचे आभार असं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. यापूर्वीही आम्ही सातत्याने म्हणत होतो की आम्ही 120 जागेवरती विजयी होऊ, आम्हाला तो विश्वास होता. प्रचारादरम्यान आमच्यावरती टीका झाली मात्र आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोलत राहिलो. पुणेकरांनी दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आनंद आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आणि सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या जोमाने काम यांचं आहे असंही मोहोळ म्हणाले.
3:58 PM, 16 Jan

Nashik Mahapalika Election Results 2026 : नाशिकमध्ये भाजपची एकहाती सत्ता

नाशिक महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपने 62 चा जादुई आकडा गाठला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. शिंदेंचा शिवसेना पक्ष दोन नंबरचा ठरला आहे.
3:38 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मानले मुंबईकरांचे आभार

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सांगितले की, मुंबईतील जनतेने भाजप युतीवर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो.
3:24 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता

वसई-विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी पक्षाने सर्वाधिक 71 जागावंर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. 43 जागा घेत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यांना खातेही उघडता आले नाही.
2:54 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : पुणे-पिंपरीत भाजपची 'लाट'; काका-पुतणे एकत्र येऊनही पराभव!

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवत बहुमताचा आकडा पार केला आहे. पुणे महापालिकेत भाजपने 90 जागांवर मुसंडी मारत सत्तेसाठी आवश्यक 82 चा आकडा सहज ओलांडला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपने 74 जागांसह सत्ता कायम राखली. पुण्यात काका-पुतण्याला एकी करुनही राष्ट्रवादीला तगडा झटका बसला आहे. अजित पवारांना केवळ 7 तर शरद पवारांना 3 जागांवर आघाडी मिळाली आहे.
2:35 PM, 16 Jan

BMC election result 2026 : मंत्री नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेसह आदित्य ठाकरेंवर निशाणा

मंत्री नितेश राणे यांनी मुंबईसह राज्यातील महापालिकेचा निकाल समोर येताच एक ट्विट करून उद्धव ठाकरेसह आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे. पाहा खास व्हिडिओ.
2:33 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : महापालिका निवडणुकीचा निकालाचा विजयोत्सव दिल्लीत

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याचे दिसून येत आहे. या निकालानंतर पक्षाचे नेते नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात मिठाईचे वाटप करत जल्लोष करून देत आहेत. भाजप-शिवसेनेची महायुती आघाडीवर आहे.
2:18 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : मुंबईत दिग्गजांच्या नातलगांना पराभवाचा धक्का

मुंबईत अनेक दिग्गजांच्या नातलगांना पराभवाचा धक्का बसला आहे. गँगस्टर अरुण गवळींची मुलगी गीता गवळी या प्रभाग क्रमांक 212 मधून मैदानात उतरल्या होत्या. त्यांचा पराभव झाला आहे. तर रवींद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर यांनाही पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेने प्रभाग क्रमांक 73 मध्ये दीप्ती वायकर पोतनीस यांना उमेदवारी दिली होती. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. प्रभाग क्रमांक 184 मध्ये खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे यांना पराभूत व्हावे लागले. काँग्रेसच्या आशा काळे यांनी त्यांचा पराभव केला. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झाला आहे. ते कुर्ल्याच्या प्रभाग क्रमांक 165 मधून मैदानात होते. महापालिका निवडणुकीत चर्चेत असलेल्या काही उमेदवारांचाही या निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. त्यात ठाकरे गटाचे मिलिंद वैद्य, हेमांगी वरळीकर, तर भाजपच्या तेजस्वी घोसाळकर आणि असलम शेख यांच्या भगिनीने विजय मिळवला आहे.
2:17 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : निशिकांत शिंदेंनी दिली समाधान सरवणकरांना मात

प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 वर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता. पण हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यापुढे सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. याठिकाणी शिंदे गटाचे समाधान सरवणकर विरुद्ध निशिकांत शिंदे अशी अत्यंत चुरशीची लढत झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा 592 मतांनी पराभव केला.
2:16 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : गुलमंडीत सचिन खैरे यांचा विजय, चंद्रकांत खैरेंचा सन्मान टिकला

संभाजीनगरची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी प्रभागात (15 अ) ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा विजय झाला आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांचा विजय झाला. हा प्रभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील ठाकरे गटाचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे ठाकरे गटाची काहीशी धाकधूक वाढली होती. पण अखेर सचिन खैरे यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारत बाजी मारली.
2:13 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : मंत्री शिरसाटांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांची विजयानंतरची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून हर्षदा शिरसाट विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 18 ड मधून शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट विजयी झाल्या. हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, अशी प्रतिक्रिया हर्षदा शिरसाट यांनी दिली आहे. महिलांसाठी आणि युवकांसाठी काम करायचा आहे, असे त्या म्हणाल्या.
2:11 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : 29 महापालिकेतील सध्याची स्थिती काय?

भाजप : 22 ठिकाणी आघाडीवर आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, नाशिक, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वसई विरार, मीरा-भाईंदर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, पनवेल, नांदेड, सांगली, इचलकरंजी, जालना या महानगरपालिकांचा समावेश आहे. ------------- काँग्रेस : ४ ठिकाणी आघाडीवर आहे. यामध्ये अमरावती, भिवंडी, लातूर चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे. ---------- शिंदेंची शिवसेना : ठाणे आणि मालेगाव या दोन ठिकाणी आघाडीवर आहे. --------- ठाकरेंची शिवसेना : केवळ परभणी या एका ठिकाणी आघाडीवर आहे.
2:06 PM, 16 Jan

Maharashtra MahaPalika Result 2026 LIVE Updates : मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला, Video

मुंबईतील भाजप कार्यालयात आता जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे. साडे तीन वाजेच्या सुमारास या ठिकाणी सर्व बडे नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
1:55 PM, 16 Jan

BMC Election Result 2026 : आशिष शेलार काय म्हणाले?

बीएमसी निवडणुकीच्या निकालावर, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार म्हणाले की, आम्हाला पहिल्या कलात चांगला विजय मिळाला आहे. मी आता मुख्यमंत्री "देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जात आहे; संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी उत्साहाने मतदान केले आहे. सर्वत्र आमचा विजय होताना दिसत आहे. असे शेलार म्हणाले.
1:53 PM, 16 Jan

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "29 पैकी 28 जागांवर भाजपची सत्ता येईल

महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "सुरुवातीचे कल आता येत आहेत. हे सुरुवातीचे कल जलद प्रगती दर्शवितात. उलट होण्याची शक्यता नाही. पुण्यात आपण १२५ च्या पुढे गेलो तर आश्चर्य वाटणार नाही. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. पिंपरीतील लढाई एकतर्फी आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्येही अशीच परिस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सकारात्मक परिणाम होतील. २९ पैकी किमान २८ जागांवर महायुती होईल."
1:47 PM, 16 Jan

Pune Mahapalika Election Result : पुण्यात मतमोजणीत मोठा घोळ, ठोंबरेचा आरोप

पुणे महापालिकेच्या मतमोजणी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या व उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. आतमध्ये ईव्हीएम मशीनची जुळवणी होत नाहीये, असा आरोप केला जात आहे.
1:45 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : मुंबईच्या प्रभाग २०९ मधून शिंदेसेनेच्या यामिनी जाधव विजयी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबई बीएमसी प्रभाग 209 मधून काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला आहे.
1:42 PM, 16 Jan

Municipal corporation election 2026 Result Live : २९ पैकी २३ महानगरपालिकांमध्ये भाजप+ आघाडीवर

महाराष्ट्रातील २९ पैकी २३ महानगरपालिकांमध्ये भाजप+ आघाडीवर, मुंबई, नागपूर आणि पुण्यात मोठी आघाडी; लातूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस बहुमत
1:35 PM, 16 Jan

मुंबईत AIMIM उघडले खाते, पहिला उमेदवार विजयी

मुंबई महापालिका वॉर्ड क्रमांक १३४ मधून AIMIM ने आपले खाते उघडले आहे. पहिला उमेदवार मेहजबीन खान विजयी झाला.
1:15 PM, 16 Jan

Maharashtra MahaPalika Result 2026 LIVE Updates : मंत्री संजय शिरसाटांच्या कन्या हर्षदा विजयी

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाठ या विजयी झाल्या आहेत. हर्षदा या सुरुवातीपासून मतमोजणीत आघाडीवर होत्या. त्यांनी ती आघाडी कायम ठेवत, विजय मिळवला आहे.
1:15 PM, 16 Jan

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे संपूर्ण पॅनल विजयी

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील एमआयएमच्या सर्व उमेदवांनी विजय मिळवला आहे. 1) काकासाहेब काकडे (अ) | 2) शाहिन रहिम पटेल (ब) | 3) सादिया अमजद खान (क) | 4) मतीन पटेल (ड)
12:59 PM, 16 Jan

Nagpur Municipal Corporation Results 2026 : नागपूर महानगरपालिकेच्या सर्व 151 जागाचे कल

नागपूर महानगरपालिकेच्या सर्व 151 जागा चे कल हाती आले आहेत. यामध्ये, बीजेपी 102 | काँग्रेस 37 | शिवसेना २ | राष्ट्रवादी अजित १ | ठाकरे १ | बसप ४
12:57 PM, 16 Jan

Jalna Mahapalika Result 2026 : आतापर्यंत 25 जागांचे निकाल जाहीर

भाजपा - २० विजयी, काँग्रेस - ३ विजयी, अपक्ष - १ विजयी, शिवसेना शिंदे गट - १ विजयी,
12:56 PM, 16 Jan

जळगावात माजी महापौरांची मुलगी पराभूत, पण मुलगा विजयी

जळगावमध्ये भाजपच्या माजी महापौर भारती सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला आहे. पण त्यांच्या मुलाने विजय मिळवला आहे. दरम्यान, भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढलेले रिपाइं जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल विजयी झाले आहेत.
READ MORE

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+