Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यात आज या भागात पाऊस पडणार! तुमच्या जिल्ह्यात आज कसा राहील पावसाचा अंदाज जाणून घ्या

Maharashtra Mumbai Rain : राज्यात काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून कोकणसह मुंबईत वरुणराजा चांगलाच बरसला. आजही कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पावसाने पंधरा जूननंतर चांगलाच जम बसवला आहे. तर तिकडे मान्सूनने राजधानी दिल्लीत धडक मारली आहे. आता महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आगामी तीस दिवस आता पावसाचेच आहे कारण जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो.

Maharashtra Mumbai Rain

कसा आहे राज्यात आजचा हवामान अंदाज?

कोकण - हवामान अंदाज

राज्यातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळणार असून तिथे रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र - हवामान अंदाज

सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून अजूनही येथे चांगला पाऊस पडू शकतो. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो पण तो तुरळक स्वरुपाचा असेल.

मराठवाडा - हवामान अंदाज

मराठवाड्यातील धाराशीव आणि छत्रपती संभाजीनगर येथे ढगाळ हवामान असून येथे हलक्या स्वरुपाताच पाऊस पडू शकतो.

विदर्भ - हवामान अंदाज

विदर्भातील अकोला, अमरावती येथे काही ठिकाणी काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नागपूर तसेच चंद्रपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान

  • कोकण गोव्यात व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
  • कोकण गोव्याल बहुतांश ठिकाणी पाऊस पडला.
  • मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्‌यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या २४ तासांतील राज्यात पडलेला पाऊस (सेंमीमध्ये)

कोकण व गोवा - तलासरी १०.८. कैपे ५.७. सुधागड पाली ५.३, वाकवली ४.७. डहाणू ४.१. मौखेडा ३.९, संगेमश्वर देवरुख ३.७, दापोली ३.४. रत्नागिरी ३.१. राजापूर ३, काणकोण कणकवली २.५ प्रत्येकी, खेड २.४, मार्गो, वैभववाडी.
ठाणे २.२ प्रत्येकी दोडामार्ग, मुरबाड, म्हसळा, लांजा २ प्रत्येकी, जव्हार वाडा सावंतवाडी १.९ प्रत्येकी, सांगे १.७, चिपळूण, माथेरान १.६ प्रत्येकी, मुरुड भिवंडी १.४ प्रत्येकी, दाबोलीम १.३, अंबरनाथ १.२, पेडणे, पोलादपूर, रोहा.
पेण, मंडणगड, कल्याण प्रत्येकी

मध्य महाराष्ट्र - हसूल त्रंबकेश्वर ६.५ प्रत्येकी, गारगोटी ५.५. ओझरखेडा ५. पेठ ४.३. इगतपुरी ४. राधानगरी ३.८. अक्कलकुया ३.५, गगनबावडा, पाँड २.८ प्रत्येकी,, चांदगड २.१. महाबळेश्वर २. दिंडोरी १.९ तळोदा वेल्हे १.८. मुल्हेर
१.७, आजरा, कोकरूड १.५ प्रत्येकी.. शाहूवाडी १.२, सुरगाणा १.०

मराठवाडा - किनवट २.४. माहूर १. लोहारा ०.७, चिखलठाणा ०.३. हदगाव ०.२. वैजापूर. तोंडापूर, परभणी ०.१ प्रत्येकी.

विदर्भ - चंद्रपूर भद्रावती ३.९ प्रत्येकी, मारेगाव २.७. झरीझमनी २.१. गडचिरोली, वणी २.३ प्रत्येकी, पांढरीकवडा १.९, घाटंजी १.७. भामरागड बल्लारपूर १.६ प्रत्येकी, लाखांदूर १.५. अर्जुनी, मोरगाव १.३ प्रत्येकी, पौनी, देसाईगंज. शिंदेवाडी, जळगाव जामोद १.२ प्रत्येकी, चामोर्शी, मलकापूर, महागाव १.० प्रत्येकी,

घाटमाथा - कोयना (नवजा) १०.२, ताम्हिणी ९.१. शिरगाव ८.०. दावडी ६.२. अंबोने ४.३. इंगरवाडी ३.२. वळवण २.४. कोयना (पोफळी) २.३, मिरा २.१, वाणगाव २.०. खोपोली १.९, लोणावळा (ऑफिस) १.८. लोणावळा (टाटा) १.७.
ठाकुरवाडी १.६. बंद १.५. शिरोटा १.०, भिवपुरी ०.९.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+