'उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही'; शिंदेंचा शिलेदार आधी बरळला अन् घेतला यु-टर्न; प्रकरण काय?
Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली होती.
"माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही," असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि विविध राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर जोरदार टीका झाली. टीका वाढत असल्याचे पाहून त्यांनी काही तासांतच आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आणि स्पष्टीकरण दिले.

नक्की प्रकरण काय?
हे प्रकरण सुरू झाले तेव्हा, शिवसेना (ठाकरे गट) ने महायुतीमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात राज्यभर आंदोलन केले होते. या आंदोलनात बुलडाण्यात शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले.
बुलडाणा शिवसैनिकांचा नादच नाही
— सिध्देश पाटील 🚩 (@Sagarpa31447100) August 12, 2025
जबरदस्त आंदोलन केले
🔥🔥 pic.twitter.com/6bFqHRYNQz
या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले होते की, "उबाठाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आले, त्यांना काही काम राहिलेलं नाही. ते माझी कॉपी करू शकत नाहीत, कारण मी ओरिजनल आहे. इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही."
त्यांनी पुढे म्हटले की, "विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा. पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात." त्यांनी ठाकरे गटाला सल्ला देत म्हटले की, "राज्यात फक्त २० जागा देऊन जनतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. जे कधी मातोश्रीतून बाहेर पडत नव्हते, ते आता रस्त्यावर पडले आहेत."
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे भिडू असे ओळख असलेले आमदार संजय गायकवाड यांचे हे वक्तव्य थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी असल्याने राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
आ. संजय गायकवाड खरंच बोलत आहेत... त्यांची कॉपी करणं हे सज्जन आणि कर्तबगार माणसाचं काम नाही...! @mieknathshinde @OfficeofUT @sanjaygaikwad34 pic.twitter.com/pWznBxn949
— SushmaTai Andhare (@andharesushama) August 12, 2025
वाद वाढताच गायकवाडांनी घेतला यू-टर्न
संजय गायकवाड यांचे वक्तव्य माध्यमांमध्ये आणि समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला. यामुळे त्यांना तात्काळ स्पष्टीकरण देणे भाग पडले. आपल्या नव्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी 'उभाठाच्या कार्यकर्त्यांच्या बापाची अवकात नाही' असे बोललो होतो. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचे नाव घेतले."
आपले म्हणणे स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटले की, "बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने उद्धव साहेबांचे वडील आहेत, पण ते सर्वांचे दैवत आहेत आणि सर्वांचे बाप आहेत. आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचीच शिकवण आहे. मी उबाठाच्या कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो, बाळासाहेबांबद्दल नाही."
यू-टर्न घेताच राजकीय वर्तुळात रंगली चर्चा!
संजय गायकवाड यांच्या या यू-टर्नने राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे, त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये (शिंदे गट) तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
दुसरीकडे, त्यांच्या स्पष्टीकरणामुळे या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, राजकारणातील 'बदलाचे राजकारण' आणि वैयक्तिक टीका टिप्पणीची पातळी किती खालावली आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications